Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Metaverse : मेटाव्हर्स तंत्रज्ञानावर फेसबुकची मक्तेदारी नाही - झुकरबर्ग यांनी केलं स्पष्ट 

Metaverse

अमेरिकेच्या फेडरल कोर्टासमोर साक्ष देताना मेटा कंपनीचे अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी मेटाव्हर्स तंत्रज्ञानावर मेटा कंपनीची मक्तेदारी नाही, तर मेटा तंत्रज्ञानासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.

फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया (Social Media) कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी अलीकडेच एक फिटनेस अॅप (Fitness App) विकत घेण्याची तयारी चालवली होती. या फिटनेस अॅपच्या माध्यमातून कंपनी मेटाव्हर्स (Metaverse) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फिटनेससाठी वापर करण्याच्या प्रयत्नात होते. पण, अॅप विकत घेऊन मेटाव्हर्स क्षेत्रात मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांच्यावर झाला. आणि त्यासाठी अमेरिकेत सॅन होजे इथं त्यांच्याविरोधात मक्तेदारी विरोधातल्या कायद्याअंतर्गत (Antitrust Law) सुनावणी सुरू आहे.    

झुकरबर्ग यांनी कोर्टात मेटा कंपनीची बाजू मांडली आहे. देशात मेटाव्हर्स तंत्रज्ञानावर आधारित व्हर्च्युअल रिआलिटी उद्योग उभा राहावा अशी मेटा कंपनीची भूमिका आहे. मेटाची मक्तेदारी असावी असा हा कट नाही, असं झुकरबर्ग म्हणाले.    

विदिन अनलिमिटेड हे अॅप विकत घेण्यावरून अमेरिकेत सुरू झालेला हा खटला हाय-प्रोफाईल मानला जातोय. आणि अमेरिकेतच नाही तर युरोपातही मेटा कंपनीवर मक्तेदारीचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. यावर झुकरबर्ग यांचं म्हणणं आहे की, त्यांचा प्रयत्न मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून लोकांमधला डिजिटल संपर्क वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि मेटाव्हर्स तंत्रज्ञान अधिकाधिक अॅप कंपन्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा विचार आहे.    

आताच्या फिटनेस अॅप विकत घेण्याच्या कृतीबद्दल ते म्हणाले, ‘मेटाव्हर्स तंत्रज्ञान विकसित होणं आणि त्याचा वापर होणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ते आम्हीच वापरतो का, हा प्रश्न महत्त्वाचा नाही.’    

अर्थात, मार्क झुकरबर्ग यांनी आपली बाजू मांडली असली तरी खटल्याची सुनावणी पुढे सुरूच राहणार आहे.    

झुकरबर्ग यांच्याविरोधातले इतर मक्तेदारीचे खटले    

विदिन इनलिमिटेड हे अॅप विकत घेण्याची प्रक्रिया एप्रिल 2022 मध्ये सुरू झाली. आणि तेव्हापासून मेटा कंपनीच्या व्हर्च्युअल रिआलिटी क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नांची चर्चा होतेय. आणि असे आरोप कंपनीवर फक्त अमेरिकेतच नाही तर युरोपातही होतायत.    

मार्क झुकरबर्ग यांनी 2021 मध्ये आपल्या फेसबुक या सोशल मीडिया साईटचं नाव बदलून मेटा असं केलं. आणि त्याचवेळी मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याकडे असलेला कल उघड केला. त्यापाठोपाठ कंपनीने मेटाव्हर्स तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीत करोडो डॉलरची गुंतवणूक केली. आणि हे तंत्रज्ञान अवगत असलेले तंत्रज्ञ कंपनीत घेतले.   

आणि कंपनी विकसित करत असलेल्या मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या व्हर्च्युअल रिआलिटी अॅपमध्ये व्हावा यासाठी कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. पण, त्या प्रयत्नांत फक्त अमेरिकेतच नाही तर युरोप आणि आशिया खंडातही कंपनीने व्हर्च्युअल रिआलिटी क्षेत्रात काम करणारी अॅप विकत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.    

आणि ही त्यांची चाल या क्षेत्रातली स्पर्धा संपवण्याची रणनिती आहे, असा आरोप जागतिक पातळीवर होतोय. युरोपमध्येही अशी किमान नऊ प्रकरणं झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीविरोधात सुरू आहेत.    

अमेरिकेतल्या प्रकरणात सध्या कोर्टासमोर खटला सुरू झाला आहे. झुकरबर्ग यांनी 2015मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेला एक ईमेल त्यांच्या विरोधकांकडून वापरला जातो. या ईमेलमध्ये झुकरबर्ग म्हणतात, ‘येणाऱ्या काळात अधिकाधिक अॅप आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये मेटाव्हर्स तंत्रज्ञानच वापरलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे.’    

झुकरबर्ग यांचा हा विचार व्हर्च्युअल रिआलिटी क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणारा आहे, असा आरोप त्यांच्यावर होतो. आणि झुकरबर्ग यांनी हा आरोप फेटाळलाय.