Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फेसबुक युझर्सच्या संख्येत घट; ‘मेटा’ कंपनीला 2.8 बिलिअन डॉलरचा तोटा!

फेसबुक युझर्सच्या संख्येत घट; ‘मेटा’ कंपनीला 2.8 बिलिअन डॉलरचा तोटा!

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा हिच्या महसुलात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत 243 मिलिअन डॉलरने घट झाली आहे. कंपनीच्या मेटावर्स विभागाचे 2.8 बिलिअन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटा कंपनीच्या फेसबुक रिअलिटी लॅब्स विभागाचे दुसऱ्या तिमाही अहवालात 2.81 बिलिअन डॉलरचे नुकसान झाले आहे. मेटा कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत कंपनीला 2.96 बिलिअन डॉलरचा तोटा झाला होता. या तोट्यामागे फेसबुकची लोकप्रियता व युझर्सची संख्या कमी होत असल्याचे सांगितले जाते.

तज्ज्ञांच्या मते, मेटा कंपनीला 28.9 बिलिअन डॉलरच्या महसुलातून 7.03 बिलिअन डॉलरचा नफा होण्याची शक्यता आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मेटाचे विविध प्रोडक्टस् 3 बिलिअनहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्यात आता घट होऊ लागली आहे. फेसबुकवरून महिलांची संख्याही कमी होऊ लागली आहे. ही संख्या कमी होण्याची कारणमीमांसा अहवालात देण्यात आली. 


मार्क झुकेरबर्गकडून माफी!

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग हे गेल्या 14 वर्षांपासून सतत युझर्सची माफी मागत आले आहेत. 2001 मध्ये फेसबुकचे लॉण्चिंग झाले होते. त्यानंतर फेसबुक हे सतत वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत राहत होते. फेसुबकवरील माहिती चोरली जात असल्याचा तसेच काही घटनांमध्ये पक्षपात केल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आले होते. अशा प्रत्येक वादविवादावेळी मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या सोशल मिडियाच्या हॅण्डलवरून युझर्सची माफी मागितली आहे. सततच्या माफीनाम्यामुळेच मार्क झुकेरबर्गने फेसबुक नाव बदलून मेटा ठेवले, असं सांगितलं जातं. 

फेब्रुवारी महिन्यातही झाला होता तोटा

फेब्रुवारी, 2022च्या सुरूवातीच्या आठवड्यात फेसबुकला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. 3 फेब्रुवारी रोजी मेटा कंपनीचे शेअर्स 26 टक्क्यांनी घसरून 237.76 डॉलर (भारतीय चलनात 17,800 रूपये) इतक्या खाली आले होते. कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये 230 बिलिअन डॉलरची घसरण झाली होती. आतापर्यंत एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे हे ऐतिहासिक उदाहरण मानले जाते. फेसबुकचा असा एक काळ होता की, लोक फेसबुकचे दिवाने होते. पण आता त्याला उतरती कळा लागली आहे. परिणामी त्याचा फटका कंपनीच्या महसुलावर होऊ लागला आहे.

दैनंदिन अॅक्टिव्ह युझर्सच्या संख्येत घट!

फेब्रुवारी, 2022 मध्ये फेसबुकला (मेटा) झालेल्या नुकसानाबाबत असं सांगतिलं जातं की, गेल्या 18 वर्षांत प्रथमच कंपनीला इतकं मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. फेसबुक युझर्सची संख्या दिवसेंदिवस रोडावू लागली. फेसबुकला झालेल्या नुकसानामुळे मार्क झुकेरबर्ग याच्या संपत्तीत 31 मिलिअन डॉलरने घट झाली.