Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Messi Gold Phone Price: मेसीच्या 24 कॅरेट सोन्याच्या फोनची किंमत तुम्हाला माहित आहे का?

Messi Gold Phone Price

Messi Gold Phone Price: 'iDesign Gold' ने मेसीच्या गोल्ड केसचे डिझाईन तयार केले आहे. त्यावर 24 कॅरेट गोल्ड कोटींग लावल्याने या फोनची किंमत अजूनच वाढली आहे.

Messi Gold Phone Price: नुकताच FIFA World Cup 2022 पार पडला आणि त्यामध्ये अर्जेंटिनाने अविश्वसनीय विजय मिळवला. यांनतर लियोनेल मेसी(Lionel Messi) जो काही चर्चेत राहिला तो आजतागायत. फुटबॉलच्या चाहत्यांनी तर त्याला डोक्यावरच घेतलं. त्याच्या या विक्रमानंतर संपूर्ण जग त्याचे फॅन झाले आहे. बऱ्याच लोकांमध्ये तर मेसीची क्रेझ ही पाहायला मिळत आहे. तो काय वापरतो, त्याला काय आवडतं, त्याचा फोन कोणता आहे इत्यादी गोष्टी सध्या फॅन्स सोशल मीडियावर आणि गुगलवर सर्च(Google Search) करताना पाहायला मिळत आहेत. 
अनेक वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून समजलं आहे की मेसीकडे 'iPhone Xs Max' हा फोन आहे. जो त्याने कस्टमाइज(customize) करून घेतला आहे. हा फोन खरेदी केल्यानंतर त्याने त्यामध्ये थोडे बदल केले आहे. या फोनसाठी तो कस्टमाइज गोल्ड केस वापरतो. आज आम्ही तुम्हाला मेसीच्या 24 कॅरेट सोन्याच्या फोनबद्दल(24 carat gold phone) आणि त्याच्या किंमतीबद्दल सांगणार आहोत.  

गोल्ड केसचे डिझाईन कोणी केले आहे?

'iDesign Gold' ने मेसीच्या गोल्ड केसचे डिझाईन तयार केले आहे. ज्यावेळी मेसीने हा फोन खरेदी केला होता त्यावेळी हा सगळ्यात महागड्या फोनच्या यादीत समाविष्ट होता. त्यावर 24 कॅरेट गोल्ड कोटींग लावल्याने या फोनची किंमत अजूनच वाढली आहे.

गोल्ड केसच्या डिझाईनमध्ये विशेष काय आहे?

या फोनच्या पाठीमागच्या बाजूस मेसीचे नाव आणि जर्सी नंबर(jersey number) डिझाईन केला आहे. याशिवाय त्याच्या पत्नीचे आणि मुलाचे नाव देखील यामध्ये टाकण्यात आले आहे. याबरोबरच डिव्हाइच्या मागे बार्सिलोना आणि अर्जेंटीनाचे बॅजपण बघयाला मिळत आहेत.

फोनची किंमत किती?

या फोनच्या किंमतीचा अंदाज लावायचा झाला तर iPhone Xs Max ची गेल्ड केस सहित किंमत साधारण 21,000 डॉलर्स किंवा भारतीय रुपयांमध्ये 17 लाख रुपये आहे. सध्या त्याच्याकडे कदाचित लेटेस्ट iPhone 14 Pro Max वगैरे असू शकतो. पण याविषयी कोणताही नवीन रिपोर्ट मिळालेला नाही.