गेल्या काही महिन्यांपासून भारतीय ऑटो सेक्टर मध्ये प्रगती बघायला मिळत आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये लक्झरी कार्सना खूप वेगाने पसंती मिळत आहे. आता ग्राहक SUV कार सोबतच Hybrid स्पोर्ट्स कारला देखील पसंती दर्शवित आहे. याचीच एक झलक म्हणजे, प्रसिद्ध McLaren ऑटोमोटिव्ह कंपनीने भारतात Hybrid स्पोर्ट्स कार Artura लाँच केली आहे. या कारची किंमत 5 कोटींवर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. McLaren ऑटोमोटिव्ह कंपनी आपल्या यूके स्थित प्लांटमधून कार तयार करते. त्यानंतर ती जगातील अनेक देशांमध्ये पाठवते.
Artura कारचे वैशिष्ट्य
हायब्रीड स्पोर्ट्स कार आर्टुरा मॉडेल मध्ये 2993 cc ट्विन टर्बोचार्ज्ड V6 पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. याशिवाय यात लिथियम आयन बॅटरीही जोडण्यात आली आहे. इंजिनमध्ये आठ स्पीड ट्रान्समिशन देखील जोडण्यात आले आहे. ज्यामुळे कारला सुपरकारचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या कारचा स्पीड ताशी 330 किलोमीटर आहे. ज्यामुळे कार चालक फक्त 3.0 सेकंदात 0-100 kmph चा वेग गाठू शकते. ताशी 0-200 किलोमीटरचा वेग 8.3 सेकंदात गाठता येतो.
भारतीय ग्राहकांबाबत कंपनीला विश्वास
McLaren कंपनीची नवीन स्पोर्ट्स कार Artura भारतीय बाजारात लाँच करण्यामागे भारतातील ग्राहकांना प्रभावित करण्याचा उद्देश असल्याचे, कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. आम्हाला विशेषतः भारतातील ग्राहकांना नवीन ड्रायव्हिंगचा अनुभव द्यायचा आहे. तसेच या कार बाबत भारतात पहिल्याच वर्षी चांगले परिणाम दिसून येतील, असा कंपनीचा विश्वास आहे.
युके येथे मॅन्युफॅक्चरिंग
McLaren ऑटोमोटिव्ह ही एक ब्रिटिश लक्झरी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. युनायटेड किंगडम देशात असलेल्या कार प्लान्टद्वारे कंपनी आपल्या कारचे उत्पादन करते. ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार कंपनी कारमध्ये बदलही करते, यासाठी ती जास्तीचे पैसे आकारते. यानंतर कंपनी आपली कार जगभरातील देशांमध्ये विक्रीसाठी पाठवते. ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            