Maulana Azad Education Loan: मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे सरकारने अल्पसंख्याकांना अर्थ सहाय्य मिळावे. तसेच, शिक्षणाचा प्रचार व्हावा या उद्देशाने स्थापन केले आहे. या महामंडळाद्वारे, शिक्षण घेताना पालक आणि विद्यार्थ्यांना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये. यासाठी त्यांना माफक दरात एज्युकेशनल लोन उपलब्ध करून दिले जाते. यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात महामंडळाकडून अर्ज मागवले जातात. या योजनेमुळे शिक्षणासाठी पालकांना खूप आर्थिक पाठबळ मिळत आहे. तसेच, या महामंडळाद्वारे इतरही शैक्षणिक योजना राबवल्या जातात. ज्यात परदेशी शिक्षण घेता येणाऱ्या योजनेचाही समावेश आहे.
Table of contents [Show]
कोणासाठी संधी?
या योजनेसाठी राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी (मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ज्यू) अर्ज करू शकतात. याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. त्याविषयी त्याच्याजवळ पुरावा असणं ही गरजेचा आहे. तसेच, योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 16 ते 32 या दरम्यान असावे. तेव्हाच तो या योजनेचा लाभ घेवू शकतो. वय जास्त असल्यास त्याचा अर्ज नकारला जावू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
किती मिळणार लोन?
मुख्यता दहावी बारावी नंतर घेतल्या जाणाऱ्या व्यावसायिक शिक्षण किंवा डिप्लोमा कोर्सला विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असला पाहिजे. यासाठी त्याला 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास 100 टक्के कर्ज मिळू शकते. कर्ज घेतल्यानंतर कोर्स संपून 6 महिने झाल्यावर किंवा पाच वर्षात कर्जाची फेड करता येते. कर्जावर वार्षिक व्याजदर फक्त 3% आहे. त्यामुळे कोणतेही व्यावसायिक शिक्षण या योजनेच्या मदतीने पूर्ण करता येऊ शकते. शिक्षण पूर्ण झाल्यावर, नोकरी मिळाल्यावर ही कर्ज फेडता येते.
महाविद्यालय मान्यताप्राप्त हवं!
अर्जदार ज्या महाविद्यालयात किंवा संस्थेत शिक्षण घेणार आहे. ते केंद्र सरकार, राज्य सरकार, एआयसीटी, यूजीसी, आयएससीद्वारा मान्यताप्राप्त असणं आवश्यक आहे. म्हणजेच यापैकी कुठल्यातरी एकाची मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांना मान्यता मिळालेली आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे. तसेच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असणं आवश्यक आहे. यापेक्षा वर असेल तर अर्ज पात्र होणार नाही. त्यामुळे तुमचे वार्षिक उत्पन्न हे योजनेच्या चौकटीत बसत असल्यास तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी Maulana Azad Minority financial Development Corporation या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फाॅलो करू शकता.
- Maulana Azad Minority financial Development Corporation मंडळाची वेबसाईट ओपन करा.
- महामंडळाच्या होमपेजवरील योजना या टॅबमधून शैक्षणिक कर्ज हा पर्याय निवडा. त्यातील मौलाना आझाद शैक्षणिक कर्जावर क्लिक करा.
- अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करून संपूर्ण माहिती भरा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा.
महत्वाची कागदपत्रे
- मागील वर्षाची मार्कशीट
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- बँक पासबुकची झेराॅक्स
- मार्कशीटमधील संपूर्ण माहिती
- ओळखपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या कॉलेजचे अॅडमिशन कार्ड आणि फी स्ट्रक्चर.