Breeza Car Average: मारुती सुझुकी ब्रेझा ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये भारतात प्रसिद्ध आहे. अनेक ग्राहक या 4 मीटर सेगमेंटमधील कारला पसंती देतात. दरम्यान नव्याने बाजारात येणारी ब्रेझा गाडी आधीच्या मॉडेलपेक्षा कमी अॅव्हरेज देत आहे. कंपनीने या गाडीमध्ये असे काही बदल केले आहेत, ज्यामुळे गाडी पूर्वीपेक्षा जास्त इंधन खाते.
कमी अॅव्हरेज देण्यामागे काय कारण?
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मॅन्युअल श्रेणीतील ब्रेझा गाडीतील 'स्मार्ट हायब्रीड' ही टेक्नोलॉजी कंपनीने काढून टाकली आहे. तसेच ऑटोमॅटिक श्रेणीतील ब्रेझा गाडीत 'माइल्ड हायब्रीड' तंत्रज्ञान वापरले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे गाडी जास्त इंधन खाते. त्यामुळे गाडीला अॅव्हरेज देखील कमी मिळेल.
आता किती अॅव्हरेज देणार?
ब्रेझा मॅन्युअल ट्रान्शमिशन गाडी 20.15 किलोमीटर प्रति तास एवढे अॅव्हरेज देईल, असा कंपनीचा पूर्वीचा दावा होता. मात्र, आता माइल्ड हायब्रीड टेक्नोलॉजीमुळे ही गाडी 17.38 कि. मी प्रति तास एवढे अॅव्हरेज देईल. तर ऑटोमॅटिक ब्रेझा गाडी 19.80 Kmpl एवढे अॅव्हरेज देईल. हे पूर्वीच्या दाव्यापेक्षा कमी आहे.
सीटबेल्ट रिमाइंडर फिचर
सेफ्टीच्या दृष्टीने ब्रेझा गाडीतील आता पाचही सीटला सीट बेल्ट रिमाइंडर बसवण्यात आला आहे. सोबतच सीएनजी गाडीतून ‘हिल होल्ड असिस्ट’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम’ हे फिचर काढून टाकण्यात आले आहे. CNG व्यतिरिक्त इतर गाड्यांमध्ये हे फिचर देण्यात आले आहे.
दरम्यान, कंपनीने वरील बदल केले असले तरी किंमत तेवढीच ठेवली आहे. ही गाडी 8.29 लाख ते 14.14 लाखांच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. लाँच केली तेव्हा ब्रेझा फक्त डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध होती. मात्र, आता CNG सह पेट्रोल व्हर्जनही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.