Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Ideas: मार्च महिना संपत आलाय; आधार-पॅन कार्ड लिंकसोबत टॅक्स सेव्हिंगही करा

Tax Saving Tips

Tax Saving Ideas: पर्सनल फायनान्सचा विचार करता 31 मार्च ही तारीख आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तुमचे पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केले नसेल तर ते करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

Tax Saving Tips: पर्सनल फायनान्सचा विचार करता 31 मार्च ही तारीख आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्यापासून टॅक्सचे नियोजन केले नसेल तर लवकर करून घ्या. कारण तुमच्याकडे आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ही तारीख तुमच्याकडून हुकली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा इतर अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

पॅनकार्ड-आधारकार्ड लिकिंग

इन्कम टॅक्स विभागाने 31 मार्च, 2023 पर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंकिंग करण्याबाबत सूचित केले आहे. दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पार न करणाऱ्यांवर  कारवाई कारवाई केली जाणार आहे. अशा कार्डधारकांचे पॅनकार्ड 1 एप्रिल, 2023 पासून बंद केले जाणार आहे. करदात्यांना 1 हजार रुपये दंड भरून ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) वेबसाईटवर उपलब्ध आहे. यासाठीचे शुल्क चलानद्वारे भरून तुम्ही आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करू शकता. करदात्यांनी हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की, इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक नसेल तर तुम्ही रिटर्न फाईल करू शकणार नाही.

आर्थिक वर्ष 2019-20चे अपडेटेड आयटीआर

आर्थिक वर्ष 2019-20 चे अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च, 2023 आहे. त्यामुळे ज्यांचे या आर्थिक वर्षातील रिटर्न अपडेट करायचे आहे किंवा ज्यांना अपडेटेड रिटर्न फाईल करायचे आहे. त्यांच्या 31 मार्च, 2023 ही अंतिम तारीख आहे. फायनान्स अॅक्ट, 2022 मध्ये अपडेटेड रिटर्न (Updated ITR) भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

अपडेटेड रिटर्न हे असेसमेंट वर्ष सुरू झाल्यानंतर 2 वर्षांच्या आत भरणे बंधनकारक आहे. तसेच ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 रिटर्न फाईल केले नाही. ते 31 मार्चपर्यंत करू शकतात.

टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक

आर्थिक वर्ष 2022-23 चा शेवटचा दिवस 31 मार्च, 2023 आहे.  त्यामुळे या आर्थिक वर्षासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही 31 मार्चपर्यंत करण्याची संधी आहे. टॅक्ससाठी गुंतवणूक ही आर्थिक नियोजनातील सर्वांत महत्त्वाची बाब आहे. विविध टॅक्स सेव्हिंग तरतुदींचा लाभ घेऊन तुम्ही बचत तर करताच. पण त्याचबरोबर टॅक्सद्वारे होणारे नुकसान ही टाळता.

अ‍ॅडव्हान्स टॅक्स प्लॅनिंग

2022-23 या आर्थिक वर्षातील अ‍ॅडव्हान्स टॅक्स प्लॅनिंगचा भाग म्हणून शेवटचा हप्ता भरण्याची तारीख 15 मार्च, 2023 आहे.या दिवशी अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्यांना उर्वरित सर्व रक्कम भरावी लागणार आहे आणि यात जर एखाद्याकडून ही तारीख पाळली गेली नाही तर त्याला कायद्यातील कलम 234B आणि 243C अंतर्गत दंड भरावा लागेल.

प्रधानमंत्री वय वंदन योजना

केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी इन्शुरन्स कम पेन्शन योजना प्रधानमंत्री वय वंदन योजना यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च, 2023 आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदाराला 7.4 टक्क्यांनी 10 वर्षांसाठी निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. साधारण यातून गुंतवणूकदाराला 1 हजार ते 9250 रुपये यादरम्यान  पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळू शकते.