भारतात डिजिटल पेमेंट करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागातही पेटीएम, फोनपे, गुगल-पे च्या माध्यमातून ग्राहक सहजपणे डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. दरम्यान, लहानमोठ्या व्यावसायिकांकडून याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून पेमेंट साउंड बॉक्समुळे या डिजिटल व्यवहारामध्ये आणखी पारदर्शकता आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रा सॉफ्टटेक या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीने नुकतेच पेमेंट साउंडबॉक्स (Soundbox)डिव्हाइस लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.
या पेमेंट साऊंड बॉक्सची डिझाइन स्वदेशी पद्धतीने करण्यात आले असून त्याची निर्मिती देखील भारतात केली जाणार आहे. आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मंत्रा सॉफ्टटेक या कंपनीने हे आणखी एक पाऊल आहे. हा पेंमेंट साऊंड बॉक्स 4G कनेक्टेड असून MS20 असे त्या मॉडेलचे नाव आहे.
भारतीय भाषांमध्ये उपलब्ध-
मंत्रा सॉफ्टटेक कंपनीने MS20 हा 4G Payment Soundbox भारतातील व्यापारी आणि ग्राहकांना सर्व भारतीय भाषांमध्ये रिअल-टाइम व्हॉइस-आधारित पेमेंट अलर्टची सुविधा प्रदान करण्याच्या उदिष्ट ठेऊन तयार केला आहे. हा कॉम्पॅक्ट साउंडबॉक्स शहरी भागासह खेड्यापाड्यातील लहान मोठ्या व्यापारी दुकानदारांसाठी जे UPI आणि QR-कोड आधारित पेमेंट स्वीकारतात, त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
4G नेटवर्कची कनेक्टिव्हिटी
हा साउंडबॉक्स 4G सिम स्लॉटसह डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे अखंडपणे डेटा कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी सीमकार्डचा वापर होईल. दुकानादास झालेल्या पेमेंटची त्वरीत माहिती मिळेल. शक्यतो नेटवर्कचा अडथळा निर्माण होणार नाही. मंत्राने डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात आपला एक ठसा उमटवण्यासाठी आणि व्यापक उद्योगाचे धोरण निश्चित करण्यासाठी 4G SoundBox लाँच करून सुरुवात केली असल्याची माहिती मंत्रा सॉफ्टटेकचे सह-संस्थापक आणि संचालक हिरेन भंडारी यांनी दिली आहे.
ग्राहकांच्या मागणीस अनुकूल डिझाइन
भारतातील डिजिटल पेमेंटच्या वापरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सध्याच्या डिजिटल पेंमेंटच्या युगात फिनटेक कंपन्यांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही त्या कंपन्यांच्या गरजेनुसार साउंडबॉक्स मशीनचे अनुकूल डिझाइन आणि उत्पादन करणार आहोत. तसेच "आम्हाला खात्री आहे की डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये आमचे पेमेंट साउंडबॉक्स डिव्हाइस वापरण्यासाठी एक आत्मविश्वास निर्माण करेल, अशीही आशा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे.