Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Make Money While Exploring the World: जगभर प्रवास करायचाय आणि पैसे देखील कमवायचेत? मग फॉलो करा या खास टिप्स

Make Money While Exploring the World

असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही जगभर प्रवास करतानाही पैसे कमवू शकतात. प्रवास केल्याने माणसं अनुभवी बनतात, नवं काही शिकतात असं म्हटलं जातं. परंतु आता प्रवास करताना माणसं पैसे देखील कमवू शकतात आणि हवं ते करू शकतात हेही लक्षात घ्या.

पर्यटन कुणाला आवडत नाही? फार कमी लोक असतील ज्यांना प्रवास करणं, नवे प्रदेश एक्सप्लोर करणे आवडत नसेल. परंतु आजच्या जमान्यातील कामाची शैली पाहिली तर कामाचा व्याप आणि प्रवास यांची सांगाड घालणं कठीण काम बनलं आहे. असं असलं तरी, जगभरात असे लाखो लोक आहेत जे जगभर प्रवास करून पैसे देखील कमवत आहेत. काय म्हणता, विश्वास बसत नाही? पण हो, हे शक्य आहे. जर तुम्ही स्मार्ट नियोजन केलं आणि प्रवास करताना, पर्यटन करतांना पैसे कमवण्याच्या टिप्स जाणून घेतल्या तर हे सहजशक्य आहे. चला तर जाणून घेऊयात अशाच काही टिप्स.

रिमोट वर्क (Remote Work)

कोविडनंतर वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अगदीच सामान्य बनली आहे. आजच्या  डिजिटल युगात तुम्ही आहात त्या ठिकाणाहून तुम्ही काम करू शकता. परंतु यासाठी तुमच्या कंपनीने तुम्हाला परवानगी देणे आवश्यक आहे. आशय लेखन (Content Writing),  ग्राफिक डिझाइन,वेब डेव्हलपमेंट, पेंटिंग ही अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्हाला कार्यालयात जाऊन काम करण्याची गरज नाहीये. या सगळ्या क्षेत्रात तुम्ही फ्रीलांसर (Freelancer) म्हणून काम करू शकता आणि सोबतच जग देखील फिरू शकता. परंतु तुमचं काम आणि तुमचं फिरणं, याचा ताळमेळ बसला पाहिजे. कारण फ्रीलांस कामांमध्ये जितके काम कराल तितकेच पैसे मिळतात.

भाषा वर्ग (Language Classes)

सध्या विविध भाषा अवगत करण्यासाठी काही लोक मेहनत घेताना दिसतात. कधी संस्कृतीची देवाणघेवाण म्हणून तर कधी करियर किंवा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा लोक शिकतात. सध्या जगभरात इंग्रजीला जास्त मागणी आहे आणि अनेक देश दुय्यम भाषा (Secondary Language) म्हणून इंग्रजी शिकवण्याच्या संधी देतात.

यासाठी टीईएफएल (टीचिंग इंग्लिश अॅज अ फॉरेन लँग्वेज) प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्ही परदेशांत शाळा, भाषा केंद्रांमध्ये इंग्रजी भाषा शिकवू शकता किंवा खाजगी शिकवणी देखील घेऊ शकता. इंग्रजी शिक्षणासाठी दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण कोरिया, चीन, थायलंड, कॅनडा आणि लॅटिन अमेरिका आदी देशांमध्ये मोठी मागणी आहे. नवा देश फिरण्याची आणि पैसे कमावण्याची ही एक मोठी संधी आहे.

वर्क एक्सचेंज (Work Exchange)

 WWOOF (वर्ल्ड वाइड अपॉर्च्युनिटीज ऑन ऑरगॅनिक फार्म्स), वर्कअवे आणि हेल्पएक्स (HelpX) सारखे वर्क एक्सचेंज प्रोग्राम आजच्या तरुणांईत विशेष लोकप्रिय आहेत. या संस्थांसोबत तुम्ही स्वतःला जोडून घेतले तर जगभरात तुम्ही सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी प्रवास करू शकतात. इथे तुमच्या राहण्याची आणि खाण्याची सोय पर्यटन प्रेमीच करतात.

टूर गाईडिंग (Tour Guiding)

जर तुम्हाला एखाद्या देशाबाबत, जागेबाबत सखोल ज्ञान आणि आवड असेल, तर टूर गाइड बनण्याचा विचार कराच. तुम्ही सहप्रवाश्यांना रंजक आणि महत्वपूर्ण माहिती देऊ शकता आणि त्या बदल्यात पैसे देखील कमवू शकता. यासाठी स्थानिक टूर कंपन्यांशी संपर्क करा. या क्षेत्रात तुम्हाला पूर्णवेळ किंवा फ्रीलान्स काम मिळू शकते.

प्रवास लेखन (Travel Blog)

 जर तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर प्रवास वर्णनाद्वारे तुम्ही तुमचे प्रवासाचे अनुभव शेअर करण्याचा विचार जरुर करा. यासाठी तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग सुरू करू शकता, तसेच ऑनलाइन पोर्टलसाठी देखील तुम्ही लेख लिहू शकता. याचे तुम्हाला चांगले मानधन मिळेल. जाहिरात, प्रायोजित सामग्री किंवा कुठल्या ब्रँडच्या मार्केटिंगमधून तुम्ही चांगली कमाई करू शकाल. कालांतराने, जसजसा तुमचा वाचक वाढत जाईल तसतसे तुम्ही तुमच्या लेखनातून उत्पन्न मिळवू शकाल.

फोटोग्राफी (Photography)

तुमच्याकडे फोटोग्राफीचे कौशल्य असेल आणि तुम्हाला त्यात आवड असेल तर, तुमचे प्रवासाचे फोटो स्टॉक फोटो वेबसाइट्सला विकण्याचा विचार करा. Shutterstock, Adobe Stock आणि Getty Images सारख्या स्टॉक फोटो वेबसाइट्स तुम्हाला याबदल्यात चांगले मानधन देऊ शकतात.

ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर (Travel Influencer)

सोशल मीडियाच्या जमान्यात, ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर बनणे हा एक करिअरचा उत्तम पर्याय बनला आहे. Instagram, YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या पर्यटनाचे मजेदार व्हिडियो शेयर करून तुम्ही ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर बनू शकता. जसजसे तुमचे फॉलोअर्स वाढत जातील तशा तुम्हाला ब्रँड मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होत जातील आणि तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता.

इथे दिलेले पर्याय खरे तर मर्यादित आहेत. याशिवाय असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही जगभर प्रवास करतानाही पैसे कमवू शकतात. प्रवास केल्याने माणसं अनुभवी बनतात, नवं काही शिकतात असं म्हटलं जातं. परंतु आता प्रवास करताना माणसं पैसे देखील कमवू शकतात आणि हवं ते करू शकतात हेही लक्षात घ्या.