Major Documents of Ownership of Land: तुम्ही नवीन वर्षात जमिन खरेदी करण्याचे नियोजन करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे. कोणत्याही जमिनीचा व्यवहार करताना ही प्रमुख सात कागदपत्रे आवश्य तपासून पहा.
Table of contents [Show]
खरेदी खत
सध्या मध्यमवर्गीय हा श्रीमंत होत चालला आहे. त्यामुळे जमिन खरेदी-विक्रीचेदेखील प्रमाण वाढले आहे. या व्यवहारात जमिनीचा मूळ मालक कोण आहे, हे सिद्ध करण्यासाठी खरेदी खत केले जाते. खरेदी खत हा या व्यवहारातील मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो. या कागदपत्रावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन माणसांमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती पैशांमध्ये झाला याची माहिती असते.
सातबारा
मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा शेतजमिनीचा सातबारा उतारा असतो. या उताऱ्यामध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, याची नोंद केलेली असते. यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते. जेणेकरून जमिनीचा खरा मालक कोण आहे?
खाते उतारा किंवा 8-अ
एखाद्या शेतकऱ्याच्या मालकीची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते. या सर्वांची शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते. 8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात मोडते, त्याची माहिती कळते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8- अ चा उतारा हा देखील महत्वाचा मानला जातो.
जमीन मोजणीचे नकाशे
जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास जमिनीची मोजणी केली जाते.यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास, तो तुम्ही पुराव्याच्या स्वरूपात दाखवू शकता. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणे आवश्यक असते.
जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले
समजा, एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल, त्या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला सुरू असेल तर अशा केसची कागदपत्रं, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र इत्यादी कागदपत्रं सांभाळून ठेवली गेली पाहिजे. याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी होतो.
प्रॉपर्टी कार्ड
बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे म्हणजेच एकूण त्याची किती संपत्ती आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते. त्यामुळे बिगर शेतजमीन क्षेत्रातील स्थावल मालमत्तेचा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्डदेखील जमिनीवर मालकी हक्क सांगणारे महत्वपूर्ण कार्ड आहे.
जमीन महसूलाच्या पावत्या
प्रत्येक वर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर, तलाठ्यांकडून एक पावती दिली जाते. ही पावतीदेखील जमिनीचा मालकी हक्क सांगणारा महत्वपूर्ण पुरावा आहे. या पावत्या फाइलमध्ये सांभाळून ठेवा, याचा उपयोग कधी ही होऊ शकतो.