The ups and downs in the crypto market continue: वर्षाच्या शेवटच्या दिवशीही क्रिप्टोकरन्सीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. क्रिप्टोमार्केटमधील महत्त्वाचे नाणे बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियम (Ethereum) या दोघांच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. मात्र द ओकेबी नाण्याने चोवीस तासांमध्ये सर्वाधिक 5.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक क्रिप्टो मार्केट कॅपिटल 794.38 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.19 टक्क्यांची किरकोळ घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -
- बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 556.17 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 0.26 टक्के घसरण झाली आहे. काल 30 डिसेंबर रोजी बिटकॉईनच्या दरात वाढ झाली होती, मात्र आज पुन्हा काही अंशी किंमतीत घट झाली आहे. बिटकॉईनची किंमत 16 हजार युएस डॉलरच्या खाली गेली नाही, हेच गुंतवणुकदारांसाठी समाधान आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.28 लाख एवढा आहे.
- इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांमध्ये 0.14 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सतत काही अंशांनी वाढत असलेली या नाण्याची किंमत आज घसरली आहे. या नाण्याची किंमत आज सकाळी 10 वाजता 1 हजार 19 यु5एस डॉलर किंमतीवर ट्रेड करत होती. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.02 लाख एवढा आहे.
- डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.06835 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 3.09 टक्क्यांनी घसरला आहे. मधल्या काळात एलॉन मस्क यांच्या ट्विटरमुळे लाईमलाईटमध्ये आलेले हे नाणे वर्षाखेरीस किंमतीत घसरत चालले आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.0200 रुपये आहे.
- लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 1.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या नाण्याची किंमत 67.92 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 5 हजार 751 रुपये आहे. या नाण्याच्या किंमतीत एक वाढ तर एक दिवस घसरण असे चित्र आठवडाभर दिसून येत आहे.
- रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3408 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 0.73 क्क्यांनी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या नाण्याच्या किंमतीत किरकोळ वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 29.0200 रुपये एवढी आहे.
- सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 1.26 टक्क्यांची वाढ झाली असून, याची किंमत 9.77 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 844 रुपये एवढी आहे.