देशातील आघाडीची वाहन उत्पादक महिंद्रा अॅंड महिंद्राने आपल्या बहुचर्चित Mahindra Thar 2WD या गाडीबाबत मोठी घोषणा केली आहे. कंपनीने Mahindra Thar 2WD चे माहिती पुस्तक ( Mahindra Thar 2WD Brochure revealed) जाहीर केले असून यात गाडीच्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. मात्र कंपनीने Mahindra Thar 2WD ची किंमत गुलदस्त्यात ठेवल्याने ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. थारचे नवीन मॉडेल तुलनेने स्वस्त असण्याची शक्यता आहे. येत्या 9 जानेवारी रोजी कंपनी Mahindra Thar 2WD ला लॉंच करण्याची शक्यता आहे.
Mahindra Thar या एसयूव्हीचे 2WD व्हेरिएंट नव्या रंगात आणि नवीन पॉवरट्रेन्ससह विकसित करण्यात आले आहे. Mahindra Thar 2WD ची नवीन गाडी ब्लेझिंग ब्रॉंझ आणि एव्हरेस्ट व्हाईट या रंगात उपलब्ध होणार आहे. Mahindra Thar 2WD मध्ये 1.5 लीटरचे पॉवरफुल इंजिन आहे. त्याशिवाय यात 6 स्पीडचा मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. 4X4 प्रकारातील मॉडेलमध्ये 2.2 लीटरचे पॉवरफुल इंजिन आहे. यात 6 स्पीडचा एमटी आणि एटी गिअरबॉक्स आहे. Mahindra Thar 2WD आणि 4X4 variants या मॉडेल्समध्ये 2.0 लीटरची टुर्बो मोटर असल्याचे माहिती पुस्तकात म्हटले आहे.
कंपनीने Mahindra Thar 2WD ची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. सध्या Mahindra Thar या गाडीची किंमत 13.59 लाख आणि 16.29 लाख या दरम्यान आहे. मात्र Mahindra Thar 2WD ची यापेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे. महिंद्रा समूहाने 10 लाख रुपयांच्या गटातील एसयूव्ही मार्केटमध्ये आपले स्थान बळकट करण्याचे प्लॅनिंग केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे Mahindra Thar 2WD या एसयूव्हीची किंमत आधीच्या मॉडेल्सपेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे. Mahindra Thar 2WD ही गाडी फोर्स गुरखाशी स्पर्धा करते.