Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahindra Thar 2WD: महिंद्रा थारची धमाका ऑफर; 10 लाखापेक्षा कमी किमतीत आणले दुसरे मॉडेल

Mahindra Thar 2WD

Image Source : www.motorbeam.com

Mahindra Thar New Model: नवीन Mahindra Tar 2WD ची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू (Mahindra Thar 2023 Price) असणार आहे आणि हि किंमत फक्त सुरूवातीच्या 10 हजार बुकिंग्सवर (Mahindra Thar New Model Car Price) लागू असणार आहे.

Mahindra Thar 2WD Launch: महिंद्रा कंपनीने थार मॉडेलला मिळणारी पसंती पाहून यामध्ये स्वस्तातले दुसरे मॉडेल लॉन्च केले. पहिल्या थारमध्ये 4x4 व्हिल ड्राईव्हची सुविधा होती. तर आता नवीन थारमध्ये कंपनीने 4x2 ची (Mahindra Thar 4x2) सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे थार आता ही फोर व्हील ड्राईव्ह आणि रिअल व्हील ड्राईव्ह अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध झाली आहे. या नवीन Mahindra Tar 2WD ची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू (Mahindra Thar 2023 Price) असणार आहे आणि हि किंमत फक्त सुरूवातीच्या 10 हजार बुकिंग्सवर (Mahindra Thar New Model Car Price) लागू असणार आहे. नवीन थारची डिलेव्हरी 14 जानेवारी, 2023 पासून होणार आहे. महिंद्राने मागील आठवड्यात या नवीन मॉडेलच्या कॅटलॉगचे लॉन्चिंग केले होते.

नवीन थारची किंमत आणि रंग (Mahindra Thar 2023 Price & Colour)

Sitting Arrangement
Photo Source: autoportal.com

कंपनीने नवीन थारसाठी दोन रंगाचे पर्याय दिले आहेत. एक आहे ब्लेजिंग ब्रोंज आणि दुसरा एवरेस्ट व्हाईट. यामध्ये इंजिनाचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक 1.5 लीटर डिझेल आणि 2.0 लीटर टर्बो पेट्रोल. डिझेल मॉडेलटची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते तर टर्बो पेट्रोल मॉडेलची किंमत 13.49 लाख रुपये (Mahindra Thar 2023 Price) ठेवण्यात आली.

इंजिन आणि पॉवर

Mahindra ने थार 2WD (Mahindra Thar 2WD) मध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन XUV300 या मॉडेलमध्येही वापरण्यात आले आहे. हे इंजिन 117hp आणि 300Nm चा टार्क जनरेट करतो. तर दुसरे इंजिन 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आले. हे इंजिन 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. तर हे इंजिन 152hp आणि 320 Nm टार्क जनरेट करते.  

Inner Features 1
Photo Source: www.carandbike.com

फीचर्समध्ये बदल नाही

दोन्ही थार दिसण्यास एकसारख्या आहेत. फक्त नवीन थारमध्ये 4x4 असे लिहिलेले नसेल, हा डोळ्यांनी पाहता येणारा किंवा कळणारा फरक आहे. 2WD थार ही फक्त हार्ड-टॉप पर्यायासह उपलब्ध आहे. गाडीच्या आतल्या बाजूस 4x4 गिअरची जागा मोकळी ठेवण्यात आली. यामध्ये ऑटो स्टार्ट/स्टॉप फंक्शन सुविधा पण उपलब्ध आहे. याशिवाय टॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल आणि डोअर लॉक/अनलॉक बटन कंट्रोल पॅनेल हटवून सेंटर कन्सोल देण्यात आला आहे.