अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023चा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी काही विशेष योजनांच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये सरकारने महिला सन्मान बचत पत्र योजना नावाची अल्पबचत योजनादेखील सुरू केली आहे. MSSC व्यतिरिक्त, सरकार महिलांसाठी इतर अनेक योजना आधीच चालवत आहे. यापैकी एकाचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. तर जाणून घ्या, योजनांमध्ये काय फरक आहे आणि कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते?
महिला सन्मान बचत पत्र योजना
महिला सन्मान बचत पत्र योजना ही एक अल्पकालीन योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे दोन वर्षांसाठी गुंतवू शकता. यामध्ये वार्षिक आधारावर 7.5 टक्के व्याज मिळते. ही योजना FDसारखी आहे ज्यामध्ये तुम्ही कमी कालावधीत गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवू शकता. यासोबतच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त मुलींसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेंतर्गत खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार 7.6 टक्के दराने व्याज देते. यामध्ये तुम्ही दरवर्षी 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळते. वयाची 21 वर्षे पूर्ण केल्यानंतर, तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता.
MSSC आणि SSYमधील फरक
महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना, दोन्ही योजना महिलांसाठी आहे. पण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. महिला सन्मान बचत पत्रात कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते, तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त मुलीच गुंतवणूक करू शकतात. महिला सन्मान बचत पत्र ही एक अल्पकालीन योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकरकमी 2 लाख रुपये जमा करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन योजना आहे ज्यामध्ये तुम्ही मुलीच्या जन्मापासून 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि मुलगी 21 वर्षांची झाल्यावर Maturity रक्कम मिळवू शकता. यामध्ये, तुम्ही प्रत्येक अल्प कालावधीत छोटी रक्कम गुंतवू शकता. जर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर महिला सन्मान बचत पत्र योजना ही एक चांगली योजना ठरू शकते. सुकन्या समृद्धी योजना दीर्घ मुदतीसाठी एक चांगला पर्याय असू शकते.
(Source: www.abplive.com)