Maggi back in 10 Rupees: ‘नेस्ले इंडिया लिमिटेडचा’ नूडल ब्रँड मॅगी आपल्या 10 रुपयाच्या जुन्या किमतीत मार्केटमध्ये एन्ट्री घेणार आहे. याआधी गेली अनेक वर्ष 10 रुपयाला मिळणारी मॅगी आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या किमतीत परतत आहे .
Table of contents [Show]
दोन वेळा मॅगीच्या किमतीत बदल
आत्तापर्यंत दोन वेळा मॅगीच्या किमतीत बदल करण्यात आले आहे. डिसेंबर 2014 मध्ये मॅगीच्या 100 ग्रॅम पॅकची किंमत 12 रुपये आणि गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 14 रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती . बाजारातील नूडल्समधील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन पुन्हा एकदा आपल्या जुन्या किमतीत परतण्याचा हा निर्णय कंपनीने घेतल्याचे लक्षात येते .
नूडल्स स्पर्धेतील स्थान कायम ठेवण्यावर भर
5 रुपये आणि 10 रुपये अशा किमतीत याआधी मॅगीचे पाकीट मिळत होते. 5 रुपये, 10 रुपये यासारख्या किमती लक्षात ठेवणे तुलनेने सोपे जाते . या किमतींमध्ये व्यवहार करणे सोपे आहे. तसेच या किमती खिशाला परवडतात अशी एक मध्यमवर्गीय धारणा असते. नेस्ले देशाच्या छोट्या मोठ्या अनेक भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असल्याने नवीन बाजारपेठांमध्येदेखील लहान व किफायतशीर पॅकच्या रूपाने एन्ट्री घेणे सोपे होते . गेल्या काही वर्षात स्टार्ट अप्सच्या रूपाने सर्वच उद्योगांमध्ये अनेक स्थानिक स्पर्धक तयार झाले आहेत. तेव्हा या नवीन कस्टमर ओरिएंटेड बदलामुळे कंपनीला लोकल मार्केटमधली स्पर्धा कमी ठेवण्यास मदत होईल.
टाटा घेणार कॅपिटल फूड्स
दरम्यान ‘नेस्ले इंडिया लिमिटेडचे’ मार्केट कॉम्पिटिटर (स्पर्धक) असलेले ‘कॅपिटल फूड्स’ ही कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स विकत घेणार असल्याची सध्या चर्चा आहे . ‘कॅपिटल फूड्स’ कडून चिंग्स सीक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स सारख्या ब्रँड्स अंतर्गत विविध प्रकारचे मसाले आणि नूडल्सची विक्री होते. यामध्ये चिंग्ज सिक्रेट मसाला , चिंग्ज चटणी तसेच चिंग्ज नूडल्स च्या विविध श्रेणींचा समावेश होतो. टाटा कंझ्युमर ‘कॅपिटल फूड्स’ च्या भागधारकांसोबत वाटाघाटीच्या अंतिम फेरीत असल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे .
टाटा होणार स्पर्धक
टाटाने ‘कॅपिटल फूड्स’ विकत घेतल्यास त्यांना ‘नेस्ले इंडिया लिमिटेड’ ही कंपनी मार्केट कॉम्पिटिटर म्हणून उभी ठाकेल. ‘नेस्ले इंडिया लिमिटेड’ नेस्ले मॅगी लेबलखाली मसाले आणि चव वाढवणारे पदार्थ देखील विकते. नूडल्स व पदार्थांची लज्जत वाढविणाऱ्या मसाल्यांच्या या बाजारपेठेत मॅगीचा या श्रेणीतील हिस्सा 60 टक्केआहे.