Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lumpsum Investment : लाइफ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड किंवा एफडीमध्ये लम्पसम इन्व्हेस्टमेंट काय असते? ते कसे कार्य करते?

Lumpsum Investment

लम्पसम कॅल्क्युलेटर (Lumpsum Calculator) तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी मिळू शकणार्‍या रकमेचा अंदाज लावण्यास मदत करतो. तुमची निवडलेली गुंतवणूक योजना तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करेल की नाही हे देखील गुंतवणूक कॅल्क्युलेटरद्वारे समजते.

मोठ्या संख्येने गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडतात. कारण त्यात कमी ट्रान्झॅक्शन होतात. तसेच, ते त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेस अनुकूल असते. तुम्हाला चांगला बोनस मिळाल्यास, आणि तुमच्या सर्व पूर्वनियोजित जबाबदाऱ्या आणि खर्चाचा प्रश्न सुटल्यानंतर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी चांगली रक्कम शिल्लक राहिली असल्यास त्यानंतर तुम्ही संपूर्ण रक्कम एका विशिष्ट गुंतवणुकीच्या योजनेत गुंतवू शकता. जर एखादा गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल आणि संभाव्य जोखीम स्वीकारत असेल, तर चल गुंतवणूक धोरण म्हणून एकरकमी गुंतवणुकीची शिफारस केली जाते. गुंतवणूकदाराने सर्वप्रकारची एकरकमी गुंतवणूक आणि गुंतवणुकीतून परताव्याचा दर मोजला पाहिजे. लम्पसम गुंतवणूक, गुंतवणूकदाराला तणावमुक्त करू शकते कारण त्याला हप्त्याच्या तारखा लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. परंतु हे एक ओझे वाटू शकते कारण तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवावी लागते. लम्पसम कॅल्क्युलेटर (Lumpsump Calculator) तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी मिळू शकणार्‍या रकमेचा अंदाज लावण्यास मदत करतो. तुमची निवडलेली गुंतवणूक योजना तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करेल की नाही हे देखील गुंतवणूक कॅल्क्युलेटरद्वारे समजते.

एकरकमी गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?

एकरकमी गुंतवणूक ही विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट योजनेत एक वेळची गुंतवणूक असते. हे सामान्यतः अशा लोकांद्वारे निवडले जाते ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे असतात. जेव्हा एखाद्याला एकरकमी गुंतवणूक करायची असते, तेव्हा ते त्यांच्या गुंतवणुकीची वेळ त्यांच्या जोखमीच्या क्षमतेनुसार व्यवस्थापित करू शकतात. ज्या लोकांना खूप पैशांची गुंतवणूक करायची असते त्यांना एकरकमी गुंतवणूक अधिक सोयीस्कर वाटते. चक्रवाढीची शक्ती तुम्हाला मुदत ठेवीसारख्या आर्थिक साधनांसाठी तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचे फायदे मिळविण्यात मदत करू शकते.

एकरकमी कॅल्क्युलेटर गुंतवणूकदारांना कशी मदत करतात?

एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याचा अंदाज लावण्यास मदत करतात. एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर युजर फ्रेंडली आहे. हे कॅल्क्युलेटर कमीत कमी प्रयत्नात कोणीही सहज वापरू शकतो. हे कॅल्क्युलेटर विनामूल्य तात्काळ रिझल्ट देतात. जे गुंतवणूकदाराचा वेळ आणि श्रम वाचवते. एकरकमी कॅल्क्युलेटर तुम्हाला गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर मिळणाऱ्या अंदाजे परताव्याच्या आधारे तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात मदत करते.