Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्वस्तात मस्त मोबाईल शोधताय, मग हे पर्याय पहा

स्वस्तात मस्त मोबाईल शोधताय, मग हे पर्याय पहा

मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन आले आहेत. कंपन्यांची वाढती स्पर्धा आणि महागडे फोन यांचा ताळमेळ आपल्या बजेटला परवडणारा असल्याने सध्या स्वस्तात जास्त फीचर्स असलेला मोबाईल घेण्यावर भर देत आहेत.

जर तुम्हाला दुकानातील किमतींपेक्षा अजून स्वस्तात मोबाईल हवा असेल तर ऑनलाईन शॉपिंग साईट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कोणत्याही मोबाईल शॉपमधून मोबाईल घ्यायचा झाला तर एमआरपी (Maximum Retail Price)वर फक्त 8 ते 10 टक्के सूट मिळते. पण तोच मोबाईल ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेतला तर 15 ते 30 टक्के सूट मिळू शकते.

मोबाईल फोन घेण्यापूर्वी अगोदर गुगलवर विंडो शॉपिंग करा. तुमच्या पसंतीच्या मोबाईल कंपनीचा रिसर्च करा. कोणत्या शॉपिंग साईटवर सेल किंवा ऑफर काय आहेत, हे तपासून घ्या. तसेच कोणत्या साईट झिरो पर्संट इंटरेस्टने (Zero percent Interest) ईएमआयवर मोबाईल देत आहेत. कोणत्या बॅंकांच्या क्रेडिट/डेबिट कार्डवर काही डिस्काऊंट किंवा कॅशबॅकची ऑफर आहे का? याची माहिती काढून तुमच्या पसंतीचा मोबाईल बूक करू शकता. तसेच तुम्हाला तो मोबाईल आवडला नाही किंवा त्यात काही अडचण असल्यास 7 दिवसात तुम्ही तो फोन परत करू शकता.

स्वस्तातील काही मोबाईल फोन पाहू

रेडमी 9 आय स्पोर्ट (REDMI 9i Sport)

रेडमी कंपनीच्या या स्मार्टफोनची ऑनलाईन किंमत 8,799 आहे. याची रॅम 4 GB आणि रोम 64 GB आहे. तसेच मेन कॅमेरा 13 मेगापिक्सल असून, सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सल यात 5000 एमएएच बॅटरी, याचा डिसप्ले 6.53 इंच आहे.

पोको सी 31 (POCO C31)

पोको कंपनीच्या या स्मार्टफोनची ऑनलाईन किंमत 8,999 आहे. तर या फोनची रॅम 4 GB आणि रोम 64 GB आहे. मेन कॅमेरा 13MP+2MP+2MP मेगापिक्सल असून सेल्फी कॅमेरा 5 MP मेगापिक्लस देण्यात आला आहे. पोकोच्या या फोनची बॅटरी 5000 एमएएच आणि डिसप्ले 6.53 इंच आहे.

सॅमसंग गॅलेस्की एफ 12 (SAMSUNG Galaxy F12)

सॅमसंग गॅलेस्की एफ 12 या मोबाईलची किंमत 9,999 रुपये असून यात 4 GB रॅम आणि 64 GB रॉम आहे. या मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे. मुख्य  कॅमेरा 48MP + 5MP + 2MP + 2MP मेगापिक्लस असून सेल्फी कॅमेरा 8 MP मेगापिक्सल देण्यात आला आहे. यामध्ये सी ग्रीन, स्कायब्ल्यू आणि ब्लॅक हे रंग उपलब्ध आहेत. याची बॅटरी 6000 एमएएच असून डिसप्ले 6.55 इंच देण्यात आला आहे. फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा फोन उपयोगी ठरु शकतो.

रेडमी 9 ए स्पोर्ट (Redmi 9A Sport)

रेडमीच्या 9 A स्पोर्ट या मोबाईलची ऑनलाईन किंमत 6,739 आहे. तर या फोनची रॅम 2 GB आणि रोम 32 GB आहे. मेन कॅमेरा 13MP मेगापिक्सल असून सेल्फी कॅमेरा 5 MP मेगापिक्सल आहे. यात 5000 एमएएचची बॅटरी असून 6.53 इंच डिसप्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये कार्बन ब्लॅक, मेटालिकब्ल्यू आणि कोरल ग्रीन या रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत.

इन्फिनिक्स स्मार्ट एचडी 2021 (Infinix Smart HD 2021)

इन्फिनिक्सच्या या स्मार्टफोनची ऑनलाईन किंमत 6,499 आहे. याची रॅम 2 GB आणि रोम 32 GB आहे. तर मेन कॅमेरा 8MP मेगापिक्सल असून सेल्फी कॅमेरा 5 MP मेगापिक्सल आहे. यात 5000 एमएएच बॅटरी आणि डिसप्ले 6.1 इंच देण्यात आला आहे.

तुमच्या खिशाला परवडणारे हे काही मोबाईल असून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवर याची खरेदी करू शकता. तसेच या सर्व मोबाईलवर 1 वर्षाची वॉरंटी आणि एक्सेसरिजवर 6 महिन्याची वॉरंटी दिली जाते.