Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर

Farmers Ineligible for PM Kisan Yojana

Farmers Ineligible for PM Kisan Yojana: पीएम योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत राज्यातील सर्वच शेतकरी आहेत. मात्र तत्पुर्वी शासनाव्दारे या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची नावांची यादी जाहीर केली आहे. चेक करा यामध्ये तुमचे नाव आहे का?

PM Kisan Yojana Update:पीएम योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा, या विचाराने सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ राज्यातील असंख्य शेतकरी मोठया प्रमाणावर घेत आहे. मात्र यामध्ये काही अपात्र शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे. अशा या अपात्र शेतकऱ्यांची यादी नुकतीच शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आली. 

पीएम योजना काय आहे? (What is PM Yojana)

पीएम योजनेला पंतप्रधान सन्मान निधी योजना असेदेखील म्हटले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हत्प्यामध्ये जमा होते. दर चार महिन्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येते. यापूर्वी शेतकऱ्यांनी 12 हप्ते देण्यात आले आहे, तर सध्या शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे. 

अपात्र शेतकरी (Ineligible Farmers)

पीएम योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार या गटातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत, ते शेतकरीदेखील या योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे त्यांना अपात्र शेतकरी म्हणून दर्शविण्यात आले आहे. यासंबंधी केंद्र सरकारने एक अपात्र शेतकऱ्यांची यादीदेखील जाहीर केली आहे.

अपात्र शेतकरी यादी अशी पहा (Check out the List of Ineligible Farmers)

पीएम किसान योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आपले नाव आहे का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. पोर्टलवर आल्यानंतर शेतकरी कॉर्नरमधील ‘स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर’ या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर व दिलेला कॅप्चा कोड टाका व शोध या बटणावर क्लिक करताच, तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, खाते क्रमांक व जन्मतारीख ही वैयक्तिक माहिती अपडेट करावी लागेल. यानंतर तुम्हाला यामध्ये जर सक्रिय असे दिसले तर तुम्ही पात्र शेतकरी व रिजेक्टटेड असे दिसले तर तुम्ही अपात्र शेतकरी ठरला आहात. जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात पीएम योजनेचे पैसे येणार आणि अपात्र ठरला असाल तर यापुढे तुम्हाला पीएम योजनेचा लाभ घेता येणार नाही.