Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lincoln House : 750 कोटी रूपये खर्चूनही पूनावाला यांना मिळत नाहीये मुंबईतील घराचा ताबा

Lincoln House : 750 कोटी रूपये खर्चूनही पूनावाला यांना मिळत नाहीये मुंबईतील घराचा ताबा

Lincoln House Deal : सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी 2015 साली मुंबईतील लिंकन हाऊसची खरेदी केली. तब्बल 750 कोटी रूपयाला पूनावाला यांनी हे घर खरेदी केले आहे. मात्र, या सर्वात महागड्या घराची मालकी अजूनही सायरस पूनावाला यांना मिळाली नाहीये.

Cyrus Poonawalla House : पूनावाला ग्रुप आणि सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) चेअरमन सायरस पूनावाला यांनी 2015 साली अमेरिकन सरकारकडून लिंकन हाऊस (Lincoln House) खरेदी केले. या घरासाठी पूनावाला यांनी तब्बल 750 कोटी रूपये मोजले. 2015 साली रियल इस्टेट क्षेत्रात झालेली हा सर्वात मोठा खरेदी व्यवहार होता. त्यामुळे मुंबईतील सर्वात महागडे घर म्हणूनही लिंकन हाऊसची प्रसिद्धी झाली. मात्र, आठ वर्षानंतरही सायरस पूनावाला यांना या घराचा प्रत्यक्ष ताबा मिळाला नाहीये. केंद्र सरकारने लादलेल्या स्थगितीमुळे पूनावाला कुटुंबिय अजुनही या घराच्या प्रतिक्षेत आहे.

सायरस पूनावाला यांच्यासह अन्य काही व्यावसायिकांनी सुद्धा अमेरिकन सरकारकडून आयोजित केलेल्या या विक्री प्रक्रियेत सहभाग घेतला होता. मात्र, ही प्रॉपर्टी सीआरझेड अखत्यारित येत असल्याने या ठिकाणी पूर्णत: नवीन बांधकाम करण्याची मुभा नाही म्हणून अन्य बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांनी ही प्रॉपर्टी खरेदी करण्यास नापसंती दर्शविली.

सरकारी अडथळा

ब्लुमबर्ग मीडियाच्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदा सायरस पूनावाला यांनी लिंकन हाऊसवर लादलेल्या स्थगितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, या स्थगितीला काही एक अर्थ नाही. हा केवळ एक राजकिय आणि समाजवादी निर्णय आहे.

लिंकन हाऊसची ही जमीन भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे अमेरिकन सरकारकडून पूनावाला यांनी ही संपत्ती विकत घेतल्यावर भारत सरकारच्या संरक्षण विभागाकडून ही भाडेतत्वाचे हस्तांतरण परवानगी व या संपूर्ण व्यवहाराला अनुमती मिळणे आवश्यक आहे. मात्र, अमेरिकन सरकारने 2011 साली या वास्तूचा वापर थांबवून थेट विक्रि प्रक्रिया सुरू केली. यावेळी त्यांनी  संरक्षण मंत्रालयाला सूचना देणे आवश्यक होते. मात्र अशा प्रकारची कोणतीही सूचना न देण्याची तांत्रिक चूक केल्यामुळे आज सायबर पूनावाला यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लिंकन हाऊस

दक्षिण मुंबईतल्या ब्रीच कँडी या सर्वात महागड्या भौगोलिक क्षेत्रामध्ये लिंकन हाऊस ही प्रॉपर्टी आहे. ब्रीच कँडी या भागातल्या सर्वच घरांच्या किंमती या गगनाला भिडणाऱ्या आहेत. त्यातही लिंकन हाऊस ही प्रॉपर्टी आजमितीला सर्वात महागडी प्रॉपर्टी म्हणून ओळखली जात आहे. अगदी समुद्राला लागूनच दोन एकरची ही जागा असून यावर 50 हजार स्क्वेअर फुटचे लिंकन हाऊस उभारले आहे. या पॅलेस मध्ये 10 खोल्या, स्विमिंगपूल, टेनिस कोर्ट, गार्डेन अशा सगळ्या सुविधा उपलब्ध आहे.

ऐतिहासिक वास्तु

1933 साली गुजरात येथील वेंकानेरचे महाराजा अमरसिंह झाला यांनी त्यांच्या निवासासाठी बांधलेली ही वास्तु आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तुला भारत सरकारकडून ग्रेड 3 हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या वास्तूमध्ये आवश्यक त्या भागात बदल करण्यासाठी बांधकामाची मुभा दिलेली असते.  

1957 साली महाराजा अमरसिंह यांनी 999 वर्षाच्या भाडेतत्वावर ही प्रॉपर्टी अमेरिकन सरकारच्या ताब्यात दिली. या ठिकाणी अमेरिकन सरकारने त्याचा वाणिज्य दुतावास स्थापन केला. 2011 साली अमेरिकन सरकारने मुंबईतील बीकेसी (वांद्रे-कुर्ला संकुल) येथे आपल्या दुतावासाचे स्थलांतर केल्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतला.