घर सजवणे, आकर्षक बनवणे (Lifestyle) प्रत्येकालाच आवडते, त्यासाठी आजच्या बदलत्या ट्रेंडमध्ये लोक विविध प्रकारचे इंटीरियर आणि फर्निचर वापरतात आणि भिंतीही चमकदार रंगांनी सजवल्या जातात. परंतु आजच्या ट्रेंडमध्ये भिंतींना आधुनिक रूप दिले जाते. भिंतींना आकर्षक बनवण्यासाठी वॉलपेपर वॉलपेपरचा वापर करण्याचा ट्रेंड सुरु आहे. यामुळे तुम्ही भिंतींना इच्छित लूक देऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला आनंदी आणि समाधानी वाटते आणि तुमच्या पाहुण्यांनाही या भिंती इम्प्रेस करतात. तेव्हा 3D वॉलपेपरचा (3D wallpaper) वापर करुन आपण घर कसे सजवू शकतो? ते आज पाहूया.
3D वॉलपेपर काय आहे?
3D वॉलपेपरमध्ये वेगवेगळे फोटो एकत्र केलेल असतात. 3D वॉलपेपर भिंतींना एक नवीन रूप देतो, वॉलपेपरचे असे अनेक प्रकार आहेत, परंतु आजकाल लोकांना 3D वॉलपेपर आवडतात कारण त्यांच्या आकर्षक स्वरूपामुळे भिंतीं मनमोहक आकर्षक वाटतात.
भिंतीवर वॉलपेपर लावण्यासाठी किती खर्च येतो?
वॉल कव्हरिंग वॉलपेपरची रेंज रु.3000 आहे. जी रु.10000 पेक्षा जास्त मध्ये देखील उपलब्ध आहे. ही किंमत वॉल कव्हरिंगच्या एका रोलसाठी आहे. ही किंमत ब्रँड, स्टाईल आणि डिझाइननुसार बदलते. वॉलपेपर रोलमध्ये उपलब्ध असतो, चौरस फूट तुकड्यांमध्ये नाही.
- भिंतीवर वॉलपेपर बनवण्याची किंमत रु. 7000 ते रु. 22000 पर्यंत असते. ज्यामध्ये वॉलपेपर आणि वॉलपेपर इंस्टॉलेशनचा खर्च समाविष्ट असतो.
- समजा, एका भिंतीची लांबी 10 फूट आणि उंची 10 फूट, तर वॉलपेपर इंस्टॉलेशन एरिया = 100 स्क्वेअर फूट, एक रोल वॉलपेपर = 50 स्क्वेअर फूट, एका भिंतीवर वॉलपेपर लावण्यासाठी आवश्यक रोल = 2, 1 रोलची किंमत = रुपये 3000 ते 10000 , वॉलपेपरची एकूण किंमत = 2×3000=6000 ते 2×10000=20000
- वॉलपेपर इन्स्टॉलेशन कॉस्ट = रु 500-1000/ रोल, एकूण इन्स्टॉलेशन कॉस्ट = 2×500=1000 ते 1000×2=2000, एका भिंतीवर वॉलपेपर बनवण्याची किंमत 7000 रुपये ते 22000 किंवा त्याहून अधिक असेल.
वॉलपेपर किती काळ टिकतो?
वॉलपेपर किती काळ टिकतो? जर वॉलपेपर रोल उच्च दर्जाचा आणि टिकाऊ सामग्रीचा बनलेला असेल आणि तो वॉटरप्रूफ असेल तर वॉलपेपर 4-8 वर्षांपर्यंत दीर्घकाळ टिकतो. चांगल्या दर्जाचा वॉलपेपर पर्यावरणाला हानी न पोहोचवता 15 वर्षांपर्यंत टिकू शकतो.