Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance Vs Fixed Deposit: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध मुदत ठेवी! जाणून घ्या फरक

Life Insurance Vs Fixed Deposit

Life Insurance Vs Fixed Deposit: “फिक्स्ड डिपॉझिट” विरुद्ध “लाइफ इन्शुरन्स” यांपैकी कोण अधिक चांगले आहे? याचे उत्तर म्हणजे “निश्चित परतावा” हवा असल्यास, FD मध्ये गुंतवणूक आणि जोखीम (Risk) कव्हर करायची असेल तर “लाईफ इन्शुरन्स” घेणे योग्य ठरू शकते.

कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्तीकडे थोडी जास्त रक्कम आली की “करावयाची पहिली गोष्ट” आणि मुलीचे लग्न असो वा मुलाचे उच्च शिक्षण, “मोडावयाची अखेरची गोष्ट” म्हणजे मुदत ठेवी अर्थात Fixed Deposit (एफडी)!!! मध्यमवर्गीय कुटुंबे आणि “एफ.डी.”चे नाते असे कित्येक दशकांपासून चालत आलेले. गेल्या दोन दशकांपासून मात्र कॅपिटल मार्केट आणि रिअल इस्टेट बाजारामधील “कोटीच्या कोटी उड्डाणांनी” हे काहीसे गणित बदलले आहे. अशीच एफडी प्रमाणे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या अर्थकारणाचा अविभाज्य भाग असणारी गोष्ट म्हणजे “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी”. अर्थातच एफडी आणि इन्शुरन्स एकमेकांना पर्याय होऊ शकत नाहीत.

मुदत ठेवीचे उद्दिष्ट निव्वळ गुंतवणूक! 

FD हे निव्वळ गुंतवणुकीचे साधन आहे, जिच्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार रक्कम ठराविक कालावधीसाठी गुंतवू शकतो. आणि FD च्या मॅच्युरिटीच्या वेळी आपल्याला गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळतो. सामान्यत: मुदत ठेवींमध्ये बँका आगाऊ सूचना दिल्याखेरीज ठरलेल्या मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देत नाहीत. मुदत ठेवींचा कालावधी 7 दिवसांपासून ते जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी असू शकतो. परंतु यामध्ये कोणतेही आर्थिक सुरक्षिततेचे वचन नसते.

इन्शुरन्स पॉलिसी लाईफ कव्हर करते

“लाइफ इन्शुरन्स पॉलिसी” नावाप्रमाणे लाइफ कव्हर प्रदान करते, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या  नॉमिनीला क्लेमची रक्कम दिली जाते. लाईफ इन्शुरन्सचे टर्म प्लॅन, चाइल्ड लाईफ, मनी बॅक, युलिप, एंडोमेंट प्लॅन,  रिटायरमेंट प्लॅन आणि होल लाइफ प्लॅन असे 7 प्रकार आहेत. आपण आपल्या गरजेनुसार इन्शुरन्स निवडू शकतो. आता तर इन्शुरन्सला फक्त “लाईफ कव्हर” म्हणून मर्यादित राहिले नसून, त्याकडे अगदी वयाच्या 99 व्या वर्षांपर्यंत करता येऊ शकणारी “दीर्घकालीन गुंतवणूक” म्हणून देखील पाहिले जाऊ लागले आहे. 

मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी किमान रक्कम 1000 रुपये आहे. मात्र कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीसाठीच्या प्रीमियमची रक्कम ही पॉलिसीचा प्रकार, पॉलिसीधारकाचे वय, पॉलिसीचे मूल्य (Sum Assured), पॉलिसीधारकाची वैद्यकीय स्थिती, लिंग, मेडिकल हिस्ट्री इत्यादींवर अवलंबून असते. मुदत ठेवींद्वारे बचत करण्यासाठी फंडाची उपलब्धता असणे किंवा नसणे, ही सबब असू शकते. मात्र इन्शुरन्सचा नियमित प्रीमियम गुंतवणुकीची आर्थिक शिस्त तर लावतोच, परंतु एक चांगला कॉर्पस (निधी) उभा करण्यास मदत करतो.  

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अगदी 40 वर्षांच्या कालावधीपर्यंत पॉलिसी टर्मचा कालावधी निवडता येतो. आणि ते देखील पुनर्गुंतवणुकीचा (reinvestment) पर्याय न वापरताही. मात्र मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा कमाल कालावधी हा वर्षेच असल्याने अधिक कालावधीकरिता गुंतवणूक वाढवायची असल्यास पुनर्गुंतवणुकीशिवाय पर्याय नसतो. “एफ.डी.”वरील व्याज-दर (interest rate) नियमितपणे कमी होत चालले असल्याने गुंतवणुकीमधील परतावा (ROI - रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) कमी होऊ शकतो. 

एफडी मधील गुंतवणूक कोणताही फायदा देत नाही. तथापि, भारतीय आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 (C) अंतर्गत केवळ पाच वर्षांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यासच कर कपातीची परवानगी मिळते. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये केलेली गुंतवणूक मात्र भारतीय आयकर कायदा, 1961च्या कलम 80 (C) आणि 10(10 (D)) अंतर्गत अनुक्रमे कर भरण्यापासून सवलत आणि करमुक्त परताव्याची हमी देते. 

“फिक्स्ड डिपॉझिट” विरुद्ध “लाइफ इन्शुरन्स” यांपैकी कोण अधिक चांगले आहे? याचे उत्तर म्हणजे “गरज हीच गुंतवणुकीचे प्राधान्य ठरवते”. “निश्चित परतावा” हवा असल्यास, FD साधनांवरील व्याजदराचा लाभ घेणे संयुक्तिक ठरेल तर, दुसरीकडे, जोखीम (Risk) कव्हर करून आर्थिक सुरक्षितता प्राधान्य असेल तर “लाईफ इन्शुरन्स” घेणे ही आपली सर्वोत्तम पैज असू शकते.