सोने. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक. “लंकेत सोन्याच्या विटा”, “जुने ते सोने”, “”आयुष्यचे सोने झाले”, एवढंच काय आशीर्वाद देतानाही “सोन्यासारखा जोडीदार मिळो”, असा सोन्याचा सहज उल्लेख आपण बोलीभाषेत आणि व्यवहारामध्ये वारंवार करीत असतो. भारतातील काही भौगोलिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या समाजांमध्ये तर सोने आणि सोन्याचे दागिने यांमध्ये केलेली गुंतवणूक हीच सर्वात महत्त्वाची मानली जाते. पण सोन्याव्यतिरिक्त देखील “केलेल्या गुंतवणुकीचे सोने” करणाऱ्या आर्थिक पर्यायाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी”.
Table of contents [Show]
सोने थेट लाईफ कव्हर देत नाही!
लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या दिवसापासून पॉलिसीधारक व्यक्तीला किंवा काही पॉलिसीज् मध्ये कुटुंबाला देखील लाईफ कव्हर लागू होते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या काही आर्थिक धारणा आणि निश्चित ध्येये असतात. लाईफ इन्सुरन्स पॉलिसी या आर्थिक ध्येयांना (म्हणजे Financial goals ना) सुरक्षित करते. दुर्दैवाने व्यक्तीसोबत अपघात किंवा मृत्यूसारखी घटना घडली असता, त्याला किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षिततेसाठी समाज, नातेवाईक, बँका किंवा सरकार यांच्यासमोर मदतीचा हात पसरावा लागत नाही. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक व्यक्तीला थेट लाईफ कव्हर देत नाही.
इन्शुरन्सच्या माध्यमातून कॉर्पस फंड तयार होतो
लाईफ इन्शुरन्स पॉलिसीसाठी नियमित भरावे लागणारे आणि ते देखील तुलनात्मकदृष्ट्या किफायतशीर प्रीमियमस् आपल्याला आर्थिकदृष्ट्या अधिक शिस्तबद्ध सेव्हिंग करण्यास भाग पाडतात. त्यामुळे पॉलिसीच्या अखेरीस एक समाधानकारक रकमेचा कॉर्पस फंड तयार झालेला असतो. जो तत्कालीन किंवा भविष्यातील प्लॅनस् पूर्ण करण्यास मदत करतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करताना मात्र तुलनेने अधिक रकमेची गरज असते. त्यासोबत सोन्यामधील गुंतवणूक आणि निर्गुंतवणूक (Investment and Redeem) अधिक सहज आणि लवचिक असल्याने एक मोठा फंड तयार होण्यात मोठा अडथळा बनतो. कारण खरेदी केलेले सोने गरजेनुसार विकून पैसे मिळवता येणे सोपे असते.
सोन्यामध्ये लॉक इन पिरियड नाही!
लाईफ इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर (समर्पण) करणे किंवा त्यावर लोन घेणे, हे थोडे वेळखाऊ आणि पेपरवर्क असलेले काम असल्याने इन्शुरन्स पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक सहजपणे काढून घेता येत नाही. त्यामुळेही एक चांगला कॉर्पस तयार होतो. सोन्यामध्ये असा “लॉक इन पिरियड” नसल्याने तात्काळ पैसे उभे करण्यासाठी “सोन्याची विक्री” हा पर्याय वारंवार वापरला जातो.
सोन्यातील गुंतवणुकीवर व्याज नाही!
काही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक ही एका अर्थाने शेअर मार्केटमध्ये वापरली जाते आणि ती अनुभवी फंड मॅनेजर्सद्वारे हाताळली जाते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा पॉलिसीधारकांना फायदा तर मिळतोच. आणि आपण आपल्या गुंतवणुकीसंबंधी धोका घेण्याच्या लिमिटनुसार (Risk Appetite) आपल्या फंडसची निवड देखील करू शकतो. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक “No interest - No income” अर्थात व्याजही नाही आणि आवकही नाही, अशी समजली जाते. याव्यतिरिक्त सोन्याची चोरी होण्याची भीती आणि पुनर्विक्रीच्या वेळी किंमत कमी होण्याची शक्यता (depreciation) देखील असतेच.
इन्शुरन्सच्या गुंतवणुकीवर करमुक्त परताव्याची हमी!
लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये केलेली गुंतवणूक भारतीय आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 (C) आणि 10(10 (D)) अंतर्गत अनुक्रमे कर भरण्यापासून सवलत आणि करमुक्त परताव्याची हमी देते. मात्र सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक अशी कोणतीही सवलत देत नाही. या उलट खरेदी केलेले सोन्याची भविष्यात विक्री करताना “शॉर्ट टर्म कॅपिटल टॅक्स” किंवा “लॉन्ग टर्म कॅपिटल टॅक्स” भरावा लागतो.
गुंतवणुकीचा पहिला धडा नेहमी गिरवून घेतला जातो, आणि तो म्हणजे गुंतवणूक नेहमी एकापेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये करावी. तेव्हा आयुष्याबरोबरच आयुष्यानंतरदेखील आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर आर्थिक स्वावलंबनाचे (Financial Freedom) हास्य फुलविणाऱ्या “लाईफ इन्शुरन्स पॉलिसी”मध्ये योग्य वेळी गुंतवणूक म्हणजे “सोन्याहून पिवळं”.