भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ (IPO) बुधवारपासून गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. या आयपीओमधून 3.5 टक्के शेअर्स विकून 21,000 कोटी रुपये उभे करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. एलआयसी आयपीओ 9 मे रोजी बंद होणार आहे.
प्राईस बॅण्ड 902-949 रुपये
एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपये ही किंमत निश्चित केली आहे. यामध्ये एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी काही शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 45 रुपये आणि पॉलिसीधारकांसाठी 60 रुपये प्रति शेअर सूट दिली जाणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी उभारले
आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार हा पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) असतो. एलआयसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी 5.92 कोटी शेअर्स 949 रुपये प्रति दराने राखीव ठेवण्यात आले होते.
6 लाख कोटी रुपये
आयपीओसाठी एलायसीचे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी सरकार 5 टक्के हिस्सा विकून 30 हजार कोटी रुपये उभारणार होती. पण आता फक्त 3.5 टक्के हिस्सा विकला जाणार आहे.
एलआयसीच्या आयपीओचा एकूण इश्यू आकार 22.13 कोटी शेअर्सचा असून त्यापैकी 10 टक्के म्हणजेच 2.21 कोटी शेअर्स पॉलिसीधारकांसाठी खुले आहेत.
IMAGE SOURCE - https://bit.ly/3OVhnjg