Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC IPO OPENING : प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी आयपीओ घ्यावा का?

LIC IPO OPENING : प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी आयपीओ घ्यावा का?

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) आयपो (IPO) 4 मे रोजी ओपन होणार आहे. प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या आयपीओमध्ये पैसे टाकावेत का? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ.

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) आयपीओ (IPO) 4 मे रोजी ओपन होणार आहे. एलआयसीमधील सरकारचा 3.5 टक्के हिस्सा कमी करून आयपीओद्वारे 20,557 कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. एलआयसी कंपनीचा आयपीओ घेण्यासाठी लहान-मोठे असे सर्वच गुंतवणूकदार इच्छूक आहेत. ज्यांनी यापूर्वी आयपीओमध्ये कधीच पैसे गुंतवले नाहीत, ते कदाचित प्रथमच एलआयसीद्वारे आयपीओमध्ये गुंतवणूक करणार असतील, अशा गुतंवणूकदारांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेक तरूण-तरूणी मोठ्या संख्येने शेअर बाजाराकडे वळले होते. त्यावेळी डिमॅट खात्यामध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली होती. त्याप्रमाणे आताही एलआयसी कंपनीचा आयपीओ खरेदी करण्यासाठी या आठवड्यात डिमॅट खात्याच्या संख्येत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे, असे ‘पेटीएम मनी’चे (PayTM Money) सीईओ वरूण श्रीधर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते एलआयसी आयपीओ (LIC IPO) हा भारतीय भांडवली बाजारासाठी एक मैलाचा दगड आहे.

एलआयसी ही सर्वसामान्य कंपनी नसून 1956 मध्ये 245 खाजगी विमा कंपन्यांचे विलीनीकरण करून संसदेत कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली आहे. एलआयसी ही जगातील पाचवी क्रमांकाची सर्वात मोठी विमा कंपनी मानली जाते. तिचे 1 लाखाहून अधिक कर्मचारी, जवळपास 5 हजार कार्यालये आणि सुमारे 14 लाख एजंट आहेत. प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी एलआयसीचा आयपीओ घ्यावा का?, याबाबत विविध तज्ज्ञांनी यावर आपली मते खाली व्यक्त केली आहेत.

प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी एलआयसीचा आयपीओ घ्यावा का?

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सचिव तुहीन कांता पांडे यांच्या मते, एलआयसीला इक्विटी मार्केटमध्ये दीर्घकालीन मूल्य निर्माता म्हणून चॅम्पियन बनवायचे आहे. हा आयपीओ एलआयसी भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मितीची पहिली पायरी ठरू शकेल, असे तुहीन पांडे यांनी म्हटले आहे.

नवीन गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी की नाही याबद्दल बोलताना, एंजल वन लिमिटेड (Angel One Ltd), कंपनीचे इक्विटी संशोधन विश्लेषक यश गुप्ता यांच्या मते “जे पहिल्यांदाच आयपीओमध्ये गुतंवणूक करत आहेत. ते एलआयसीच्या आयपीओसाठी अर्ज करू शकतात. अशा गुंतवणूकदारांसाठी ही खूपच चांगली संधी आहे. असे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतात."

अॅक्सिस सिक्युरिटीजचे (Axis Securities) एमडी आणि सीईओ बी. गोपकुमार यांच्या मते, “पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या आयपीओसाठी अर्ज केला पाहिजे; कारण यामुळे त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीसह मार्केट लीडर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. कंपनीनेही किरकोळ गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांसाठी सवलत देऊन त्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.”

ट्रेडिंगोचे (Tradingo) संस्थापक पार्थ न्याती यांच्या मते, “एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आहे. एलआयसीचा प्रीमियमच्या बाबतीत 61.6 टक्के बाजार वाटा आहे आणि वैयक्तिक पॉलिसी धारकांच्या संख्येनुसार बाजारात 71.8 टक्के वाटा आहे.