Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kukut Palan Yojana Maharashtra : जाणून घेऊया ‘कुक्कुट पालन कर्ज योजने’ विषयी

Kukut Palan Yojana Maharashtra

राज्यातील वाढती बेरोजगारीचा प्रश्न सुटावा आणि कृषी विभागाला चालना मिळावी या मुख्य उद्देशाने राज्यात ‘कुक्कुटपालन योजना’ ('Kukut Palan Yojana Maharashtra') सुरु करण्यात आली.

राज्यातील वाढती बेरोजगारीचा प्रश्न सुटावा आणि कृषी विभागाला चालना मिळावी या मुख्य उद्देशाने राज्यात कुक्कुटपालन योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात. या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे. कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो. या ‘कुक्कुट पालन कर्ज योजने’चा ('Kukut Palan loan scheme maharashtra') लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील, अशी सरकारला आशा आहे.

योजनेचे पात्रता निकष : (Eligibility criteria of the scheme)

  • महाराष्ट्रातील व्यक्तीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • जर कोणी व्यक्ती आधीपासून शेळी पालन, मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येईल.
  • कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • ज्या शेतकऱ्याने आधीच ‘कुक्कुटपालन योजने’चा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
  • शेतकरी असला पाहिजे.
  • महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
  • महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
  • व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजे.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.

‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Necessary documents)

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • सातबारा उतारा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक अकाउंट नंबर 
  • मोबाईल नंबर

कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया (Application Process of Poultry Scheme)

सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, वाणिज्य बँक, राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बँक, सर्व व्यावसायिक बँक या ठिकाणी कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करता येतो. जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल. तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्‍यांकडे सुपूर्द करावी लागतील. त्यानंतर बँक कर्मचारी कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील. आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते. तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची रक्कम सुपुर्द करण्यात येईल.

या योजनेचे फायदे (Benefits of the scheme)

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा खूपच कमी असतो.
  • कुक्कुटपालन योजनेतून देशाला वर्षभरात 26 हजार कोटींचा कर जमा होत आहे.