Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

खर्च कमी करायला शिका...

खर्च कमी करायला शिका...

योग्य तिकडेच खर्च करा. खर्चाच्या नोंदी ठेवा. वाईट सवयींपासून दूर राहून खर्चावर नियंत्रण अशाप्रकारे नियंत्रण आणा.

पैसे कमावणे आणि गुंतवणूक करणे जितके आवश्यक आहे; तितकेच आवश्यक आहे खर्च करताना विवेक वापरणे. आपल्या सवयी चांगल्या प्रकारे रुजवणे. ज्यामुळे खर्च योग्य ठिकाणी आणि कमी होईल.

बजेट तयार करा 

आपल्यापैकी बहुतेक लोक जमा खर्चाच्या बाबतीत फारसे प्रामाणिक नसतात. तो लिहून ठेवण्याचा कंटाळा करतात. बऱ्याचवेळा आपला पैसा कुठे जातो याकडे दुर्लक्ष होतं. आपण नेहमीच खूप घाईत असतो. त्यामुळे खर्चाची नोंद करायला विसरतो. महिन्याच्या शेवटी जेव्हा आपण  आपल्या खात्यातील शिल्लक पाहतो. तेव्हा आपल्याला खर्चाचा ताळमेळ न लागल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. भविष्यातील असे आर्थिक धक्के टाळण्यासाठी, तुमची सर्व जुनी बिले, कार्ड आणि बँक स्टेटमेंट गोळा करण्यास सुरुवात करा. त्याचे विविध शीर्षकांखाली विस्तृतपणे वर्गीकरण करा. जेणेकरून तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयी आणि ते आवश्यक आहे का हे समजू शकेल. त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक  बजेट बनवा.

खर्चाची नोंद ठेवा

प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा खर्च करायची वेळ येईल तेव्हा लक्षात ठेवून खर्चाची नोंद करा.  तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध असलेल्या अॅप्सचा वापर करून ह्या नोंदी ठेवू शकता. अशी अनेक मोफत अॅप्स उपलब्ध आहेत जी तुम्हाला फक्त खर्चच नाही तर दिवसभरातील व्यवहारांची यादी बनवण्यास मदत शकतात.  check.me , Mint, Doxo, अशा प्रकारची अॅप्स वापरुन तुम्ही खर्चाची नोंद वेळच्या वेळी करु शकता.      

डिजिटल कार्डचे व्यवस्थापन करा

क्रेडिट कार्ड वर तुम्हाला काही रक्कम मर्यादा दिलेली असते. त्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च न करण्याची काळजी घ्या. क्रेडिट कार्डची बिले बिल भरण्याच्या तारखे आधी किंवा त्याच तारखेला भरत जा. ज्यामुळे लेट फी लागणार नाही आणि त्यामुळे खर्च होणारे जास्तीचे पैसे ही वाचतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या दैनंदिन गरजांमधील खूप महत्त्वाचे असेल त्यासाठीच कार्डद्वारे खरेदी करा अन्यथा अशी खरेदी टाळा.

घरचे जेवण      

घरी शिजवलेले अन्न हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या पाकिटासाठी अत्यंत हलके आहे. घरचे पोटभरुन केलेलं जेवण बाहेर गेल्यावर फास्ट फूडची इच्छा कमी किंवा नाहीशी करु शकते आणि अर्थातच बाहेरच्या खाण्यावर होणारा अतिरिक्त खर्च टाळू शकतो.      

खरेदी      

बऱ्याच लोकांना खरेदी हे एक मोठे स्ट्रेस बस्टर वाटते. पण त्या खरेदीमुळे अतिरिक्त खर्च झाल्यावर त्याच खर्चामुळे परत एकदा स्ट्रेस येऊ शकतो.  अनावश्यक खरेदी टाळणे हा त्यावरील एक उपाय आहे. काही आठवडे, महिने असे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, खरेदी करायच्या ठरवलेल्या वस्तुंपैकी अर्ध्या अधिक वस्तू खरतर विकत घेणं अजिबात गरजेचं नाही.

वाईट सवयींपासून मुक्त व्हा      

व्यसनांमुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. तसेच व्यसनांमुळे तब्येतीवर होणाऱ्या त्रासामुळे तुमचे आणखी पैसे खर्च होवू शकतात. व्यसन लगेच सोडणे शक्य नसेल तर हळुहळु प्रमाण कमी करून नंतर त्या व्यसनांपासून मुक्त व्हा. अशाप्रकारे व्यसनमुक्त जगण्यामुळे तुमचा खिसा देखील पैशांनी भरलेला राहील आणि तुमचे स्वास्थ्य देखील चांगले राहील.      

एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की खर्च करण्याच्या सवयी, बचतीच्या सवयींसह आणि गुंतवणुकीची बाजू मजबूत करण्यासाठी एक यशस्वी मार्ग तयार करत असतात. अनियंत्रित खर्च करुन व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळ आपल्या खर्च करण्याच्या सवयी बदला आणि सुरक्षित आयुष्य जगा.