Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Caps Investment: म्युच्युअल फंडमधील स्मॉल कॅपमधील गुंतवणुकीबाबत अधिक माहिती जाणून घ्या

Mutual Funds Investment

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Mutual Funds Investment: दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरल फंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी आहेत. त्यापैकी स्मॉल कॅप फंडबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Small Caps: गेल्या अडीच वर्षांपासून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा एक अत्यंत चांगला पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्युच्युअल फंडामध्ये लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरल फंड अशा अनेक श्रेणी आहेत. यापैकी एक श्रेणी स्मॉल कॅप फंड अशी आहे. या कॅटेगरीतील स्कीमने 2023 मधील गुंतवणुकीचा अंदाज घेतल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्याचे दिसून येते.

स्मॉल कॅप फंड म्हणजे काय?

स्मॉल कॅप फंडमध्ये जमा होणार गुंतवणूक ही संबंधित फंड मॅनेजरकडून, स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवली जाते. स्मॉल कॅप कंपन्यांचे मार्केटमधील भांडवल कमी असते. या कंपन्यांचे मार्केटमधील भांडवल साधारण 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असते. त्यामुळेच अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड स्कीमना स्मॉलकॅप फंड म्हटले जाते. मार्केटमधील प्रचलित नियमानुसार स्मॉल कॅप कंपन्यांचा क्रमांक 251 पासून सुरू होतो. मार्केट कॅप हे गुंतवणूकदारांना कंपनीचे मूल्यांकन करण्यात मदत करते. त्याचबरोबर या कॅपच्या कॅटेगरीतून गुंतवणूकदार एका कंपनीची दुसऱ्या कंपनीशी तुलना देखील करू शकतात.

स्मॉल कॅपकडून चांगला परतावा

सन 2000 पासून जगभरात मल्टीबॅगर्सच्या यादीत भारताचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. भारतातील मल्टीबॅगर्समध्ये स्मॉल कॅप्सची स्थिती सर्वांत मजबूत आहे. स्मॉल कॅप्स अल्फा जनरेशनसाठी चांगली संधी उपलब्ध करून देतात. अल्फा जनरेशन म्हणजे जेव्हा जेव्हा हे फंड त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये येतात, तेव्हा ते त्यांना चांगला परतावा देतात किंवा अतिरिक्त जोखीम न घेता निवडक बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा देत असल्याचे दिसून आले आहे.

गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ

बऱ्याचवेळा गुंतवणूक  सल्लागारांकडून सांगतिले जाते की, स्मॉल कॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. या फंडची व्हॅल्यू आणि त्यात सातत्याने होत राहणारी वाढ यामुळे चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काहीवेळेस उलटही होऊ शकते. लार्ज कॅपच्या तुलनेत स्मॉल कॅप (Price to Earnings Ratio) फंडमधील वाढ ही अधिक जाताना दिसते. यामध्ये निफ्टी स्मॉल कॅप 100 ईपीएसमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत दर महिन्याला स्मॉल कॅप फंडामध्ये बऱ्यापैकी वाढ होत आहे. मे 2023 मध्ये, स्मॉल कॅप फंडमध्ये 3,282.50 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. यापूर्वी, एप्रिलमध्ये 2,182.44 कोटी रुपये, मार्चमध्ये 2,430.04 कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये 2,246.30 कोटी रुपये आणि जानेवारीमध्ये 2,255.85 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)    

Source: Zee Business Hindi