Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एका वर्षात 2 लाख रुपये कसे कमवायचे, जाणून घ्या

एका वर्षात 2 लाख रुपये कसे कमवायचे, जाणून घ्या

तुम्हाला जर एका वर्षात 2 लाख रुपये कमवायचे असल्यास तुम्ही खालील गोष्टी करू शकता. पैसे कमावण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. यातील तुमच्यासाठी योग्य मार्ग कोणता हे तुम्हीच ठरवू शकता.

प्रत्येक व्यक्तीला आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज लागत असते. यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरीने दिवसरात्र कष्ट करत असतो. पैसे कमावण्यासाठी कष्टांशिवाय पर्याय नाही. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमावता येऊ शकतात. पण त्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. आज आपण अशाच काही व्यावसायिक कल्पना पाहणार आहोत. ज्यातून तुम्ही वर्षाला 2 लाख रूपये कमवू शकता. यातील काही व्यवसायांना सरकारकडून मदत मिळते.

मसाल्याच्या पदार्थांची विक्री

फूड प्रॉडक्टसच्या माध्यमातून तुम्ही मसाल्याच्या पदार्थांची विक्री करण्याच्या व्यवसायात उडी मारू शकता. मसाल्याचे पदार्थ किमान 2 महिने टिकतात. त्यामुळे किमान 90 हजार रूपयांच्या भांडवलातून तुम्ही 30 टक्के नफ्यासह या व्यवसायाची सुरूवात करू शकता. पहिल्या वर्षातील अनुभवाच्या जोरावर पुढील वर्षात तुम्ही ट्रान्सपोर्टद्वारे थेट सेवा देण्याच्या व्यवसायातही उतरू शकता. एका व्यवसायासोबत त्याला जोडून पूरक व्यवसाय देखील करता येऊ शकतो.

शेळीपालन

शेळी पालन व्यवसाय हा अतिशय फायदेशीर व्यवसाय मानला जातो. यातून चांगल्या पैशांची कमाई करता येते. कमी जागेत आणि कमी खर्चात शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करता येतो. शेळीपालन व्यवसायासाठी केंद्र सरकार 35 टक्के अनुदान देते तर राज्य सरकार ही काही प्रमाणात सबसिडी देतं. या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसले तरी तुम्ही बॅंकेकडून किंवा नाबार्डकडून (NABARD) कर्ज घेऊ शकता.

शेळीच्या दुधापासून आणि बोकडाच्या मांसामधून मोठी कमाई होते. शेळीच्या दुधाला बाजारात मोठी मागणी आहे. एका अहवालानुसार 18 मादी शेळ्यांमधून सरासरी 2,16,000 रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. तर बोकडाच्या मांस विक्रीतून सरासरी 1,98,000 रुपये मिळू शकतात.

बाटलीबंद पाणी

बाटलीबंद पाणी आणि जार विकण्याचा व्यवसाय ही तुम्ही सुरु करू शकता. यात प्रत्यक्ष पाणी शुद्ध करणाऱ्या मशीन्सचा वापर करून तुम्ही स्वत:च्या ब्रॅण्डचे बाटलीबंद पाणी किंवा पाण्याचे जार विकू शकता. यासाठी एकदाच भांडवल गुंतवावे लागते. त्यानंतर तुम्हाला इतर कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. तसेच तुम्ही बाटलीबंद पाण्याची विक्री करूनही चांगला नफा कमाऊ शकता.

मधमाशी पालन

मधमाशी पालनातून फक्त मध किंवा मेण मिळत नाह. तर यातून मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बी गम, मधमाशी परागकण यांसारखी अनेक उत्पादने मिळतात. या सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. मधमाशी पालनासाठी नॅशनल बी बोर्ड (NBB) ने नाबार्डच्या मदतीने मधमाशी पालनासाठी आर्थिक सहाय्याच्या योजना सुरू केल्या आहेत. तर या व्यवसायासाठी सरकार 80 ते 85 टक्के अनुदान देते. 

सुरूवातीला 10 खोक्यांपासून मधमाशी पालन सुरू करू शकता. एका पेटीत 40 किलो मध, असा 10 खोक्यांचा 400 किलो मध मिळेल. हा मध 350 रुपये प्रति किलो दराने विकल्यास 400 किलो मधाचे 1.40 लाख रुपये मिळतील. मधमाशी पालनाची प्रत्येक एका पेटीची किंमत 3500 रूपये असेल तर एकूण खर्च 35 हजार रूपये आणि नफा 1.05 लाखांचा होऊ शकतो.

अमूल फ्रंचायझी 

अमूल कंपनी ग्राहकांना फ्रंचायझी ऑफर करत आहे. अमूल फ्रंचायझीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही महिन्याला चांगली कमाई करू शकता. अमूलची फ्रंचायझी 2 ते 6 लाखांत मिळते. शिवाय अमूल यावर कोणतीही रॉयल्टी किंवा नफ्याचा हिस्सा ही घेत नाही. फ्रंचायझी गेण्यासाठी तुमच्याकडे किमान 150 ते 300 चौरस फुटांची जागा असणे गरजेचे आहे.

वरीलपैकी कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम मनाची तयारी करा. त्यासाठी अधिकाधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवा. कारण कोणत्याही व्यवसायातून सहज पैसे मिळत नाहीत. त्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. ती करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही 2 लाख नाहीत तर वर्षाला 5 ते 10 लाख रूपये कमवू शकता.