• 05 Feb, 2023 14:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Layoffs Vs Firing : कंपनीच्या लेऑफ आणि फायरिंगमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या

Layoffs Vs Firing

सध्या टेक कंपन्यांमध्ये (Tech companies) कर्मचारी कपातीचा पूर आला आहे. यामुळे सध्या लोकांमध्ये लेऑफ आणि फायरिंग म्हणजे काय? यात काय फरक आहे? यावर चर्चा सुरु आहे. ते आज समजून घेऊया.

सध्या टेक कंपन्यांमध्ये (Tech companies) कर्मचारी कपातीचा पूर आला आहे. नवीन वर्षात अँमेझॉन (Amazon) आणि सेल्सफोर्स (Salesforce) नंतर मायक्रोसॉफ्ट (Microsoft Layoff) आणि गुगल (Google Layoff) यांनीही ले-ऑफ जाहीर केले आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल एकूण 22,000 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवणार आहेत. यापूर्वी अँमेझॉनने 18,000 लोकांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. एकंदरीत, टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. दरम्यान, एक शब्द ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे तो म्हणजे लेऑफ. याचा अर्थ कपात, म्हणजेच कंपनीतून कर्मचाऱ्यांना काढून टाकणे. मात्र कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणे याला फायरिंग सुद्धा म्हणतात, मग हा शब्द इथे का वापरला गेला नाही. वास्तविक, ले ऑफ आणि फायरिंगमध्ये काही मूलभूत फरक आहे. पहिल्यांदा ले ऑफ म्हणजे काय? ते समजून घेऊ.

लेऑफ म्हणजे काय?

कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना कंपनीतून कायमचे किंवा तात्पुरते काढून टाकणे याला लेऑफ म्हणतात. यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकायचे म्हणजे त्याची कामगिरी खराब होती असे अजिबात होत नाही. कॉस्ट कटिंगच्या वेळी कंपन्या त्याचा वापर करतात. याशिवाय, उत्पादन किंवा सेवेची मागणी कमी झाल्यास, अर्थव्यवस्थेत उलथापालथ किंवा व्यवसाय हंगामी बंद झाल्यास ले-ऑफचा आधार घेतला जातो. कपाती दरम्यान काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम, नोटीस कालावधी आणि कंपनी देऊ शकत असलेल्या इतर सर्व सुविधा प्रदान केल्या जातात.

फायर्ड म्हणजे काय?

लेऑफ म्हणजे काय? ते कळले. आता फायरिंगबद्दल जाणून घेऊया. एखाद्या कर्मचाऱ्याला खराब कामगिरी, कामात हलगर्जीपणा, कंपनीच्या नियमांचे उल्लंघन आणि कंपनीचे इतर कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास कामावरून काढून टाकले जाते. यामध्ये, कंपनी कदाचित त्याला नोटीस पिरीअडमध्ये काम करण्याची संधी देखील देत नाही आणि त्याची फुल अँड फायनल हिसाब त्वरित केली जाते. याशिवाय इन्शुरन्स फॅसिलिटी आदी अनेक सुविधाही कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत, तर कपातीदरम्यान काढलेल्या कामगाराला पुढील काही महिने या सुविधा मिळत राहतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, कामावरून कमी करणे हे कर्मचार्‍याच्या कामगिरीवर अवलंबून नसते, तर कामावरून काढून टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची कामगिरी असते.