सरकारी कंपन्यांमध्ये सुरक्षित गुंतवणूक संधी आणि निश्चित परतावा देणारी केंद्र सरकारची भारत बॉंड ईटीएफ योजनेची घोषणा झाली आहे. 11 वर्ष मुदतीची भारत बॉंड ईटीएफ-एप्रिल 2033 या योजनेत गुंतवणूकदारांना किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे.यावर 7.5% परतावा मिळणार आहे.18 एप्रिल 2033 रोजी 'भारत बॉंड ईटीएफ'ची मुदतपूर्ती होणार आहे. एडलवाईज एएमसी (Edelweiss Asset Management) ही कंपनी या योजनेचे व्यवस्थापन करत आहे. 8 डिसेंबरपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येईल.
भारत बॉंड ईटीएफ-एप्रिल 2033 या योजनेत AAA मानांकन असलेल्या सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.ही योजना निफ्टी भारत बॉंड इंडेक्स या निर्देशांकाशी संलग्न असेल. या योजनेचा एक्सपेन्स रेशो 0.0005% इतका नगण्य आहे.डिमॅट खाते नसले तरी या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. भारत बॉंड ईटीएफ-एप्रिल 2033 या योजनेतून किमान 1000 कोटींचा निधी उभारण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
'भारत बॉंड ईटीएफ'आतापर्यंत 50000 कोटींची गुंतवणूक
केंद्र सरकारने 4 डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा भारत बॉंड ईटीएफ योजना सादर केली होती. त्याचे आतापर्यंत तीन टप्पे झाले आहेत. भारत बॉंड ईटीएफ 2023, 2025, 2030, 2031 आणि 2032 या योजना आल्या आहेत.'भारत बॉंड ईटीएफ'मध्ये आतापर्यंत 50000 कोटींचा निधी उभारण्यात आला आहे. भारत बॉंड ईटीएफ-एप्रिल 2033 हा चौथा टप्पा आहे.