Lalbaugcha Raja 2023: मुंबईतीच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिले आहे. पहिल्याच दिवशी भक्तांनी राजाच्या दानपेटीत रोख 42 लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने दान केले. मागील 4 दिवसात भक्तांनी राजाला 2 कोटी 30 लाख 77 हजार रुपये दान केले आहेत.
लालबागच्या राजा चरणी मस्तक ठेवण्यासाठी फक्त सर्वसामान्य भाविकच नाही तर सेलिब्रिटींपासून राजकारणी, मंत्री हे सुद्धा आवर्जून हजेरी लावतात. राजाला केलेला नवस पूर्ण होतो , म्हणून लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी देशभर ख्याती आहे. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या कमी नाही. भक्तांचा नवस पूर्ण झाला की, राजाच्या दानपेटीत कोणी रोख पैसे टाकतं, तर कोणी सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने, मोदक, दुर्वा अशा कोणत्याही वस्तू दान करत आहेत. या दानपेटीत परदेशी चलनसुद्धा सापडत आहे.
Table of contents [Show]
सोन्याची मूर्ती, चांदीचे मोदक दुर्वा, बॅट
लालबागच्या राजाचा नवस पूर्ण झाला की, भक्त नवसामध्ये सांगितल्याप्रमाणे वस्तू दान करत आहेत. यामध्ये सोन्याचा बालकृष्णापासून, चांदीचे मोदक, चांदीच्या दुर्वा, बॅट अशा वस्तू सापडत आहेत. पहिल्याच दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या चरणी 198.550 ग्रॅम सोने आणि 5,440 ग्रॅम चांदी जमा झाली होती.
पहिल्या दिवशी भाविकांनी बाप्पाला केलेल्या दानाची मोजदाद
रोख रक्कम - 42 लाख
सोनं - 198.550 ग्रॅम
चांदी - 5,440 ग्रॅम
दुसऱ्या दिवशीच्या दानाची मोजदाद
रोख रक्कम - 60 लाख 62 हजार
सोनं - 183.480 ग्रॅम
चांदी - 6,222 ग्रॅम
तिसऱ्या दिवशीच्या दानाची मोजदाद
रोख रक्कम - 56 लाख 50 हजार
सोनं - 497.500 ग्रॅम
चांदी - 5,872 ग्रॅम
चौथ्या दिवशीच्या दानाची मोजदाद
रोख रक्कम - 71 लाख 65 हजार
सोनं - 412.800 ग्रॅम
चांदी - 7,523 ग्रॅम
पाचव्या दिवशीच्या दानाची मोजदाद
रोख रक्कम - 48 लाख 70 हजार
सोनं - 192.250 ग्रॅम
चांदी - 3,876 ग्रॅम