नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडने (एलटीएफएच) जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 531 कोटीचा नफा झाला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा नफ्यात 103% वाढ झाली.
एकूण कर्जवाटपात रिटेल कर्जाच्या पोर्टफोलिओचे प्रमाण 82 टक्के गाठताना कंपनीने 'लक्ष्य 2026' मिशनमध्ये निश्चित केलेल्या 80 टक्के रिटेल कर्जाच्या उद्दीष्टापेक्षा अधिक उद्दीष्ट साध्य केले आहे. 'लक्ष्य 2026' योजनेतील बहुतांश उद्दीष्टे हे तीन वर्ष अगोदरच पुर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.
कंपनीने वित्तीय वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत आणलेले ग्राहकाभिमुख अॅप्लिकेशन हे कंपनीच्या ग्राहकांसाठी अतिशय शक्तशाली डिजीटल माध्यम ठरले असून आत्तापर्यंत या अॅपने 44 लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे.
कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 11 हजार 193 कोटी रुपयांचे रिटेल कर्जवाटप केले असून त्यात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 25 टक्के वाढ झाली आहे. रिटेल विभागात विविध प्रकारच्या कर्जातील बळकट वाढीचे पाठबळ मिळाले आहे. रिटेल कर्जाची रक्कम आता 64 हजार 274 कोटी रुपयांवर झेपावली असून 30 जून 2022 अखेरच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात 34% वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 82% रिटेल कर्जाचे उद्दीष्ट साध्य केले. उत्तम दर्जाची मालमत्ता बाळगत एका बाजूला रिटेल कर्ज मालमत्ता पुस्तिकेची अधिक जोरदारपणे वाढ साध्य करणे आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला घाऊक कर्जाच्या पुस्तिकेत तितक्याच जोरदारपणे घट घडवून आणणे, या दुहेरी धोरणाला या यशाचे श्रेय जाते. फिनटेकच्या पातळीवर, आमचे ग्राहकाभिमुख अॅप प्लेनेटने आत्तापर्यंत 44 लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडल्याचे मत एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दिनानाथ दुभाषी यांनी व्यक्त केले.
ग्राहकांच्या बहुतांश गरजांची पूर्तता करताना त्यात सातत्याने नवनवीन आकर्षक फिचर्सची भर टाकली जात आहे. यापुढे वाटचाल करताना आम्ही आमची वाढीची गती कायम राखू परंतु त्याचबरोबर ग्राहककेंद्रीत आणि सातत्यपूर्ण फिनटेक@ स्केल बनण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू. आमच्या डिजीटल सेवा प्रकारांच्या माध्यमातून ग्राहकांवर आधारित अर्थप्रणालीच्या प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहचत ग्राहकांसाठी एक मूल्यप्रणाली म्हणून डिजीटल वित्त वितरण सातत्याने विकसित करत राहू असे त्यांनी सांगितले.
पहिल्या तिमाहीत 4511 कोटी रुपयांचे ग्रामीण समूह कर्ज आणि सूक्ष्म कर्ज वितरण हे या कर्जाचे तिमाहीतील उच्चांकी वितरण ठरले आहे. त्यात वार्षिक 18% वाढ नोंदविली गेली आहे. कर्ज वितरणापासून वंचित बाजारपेठांतील भौगोलिक भागामध्ये कंपनीची खोलवर मुसंडी, उच्च दर्जाच्या कर्जदारांचे सुदृढ प्रमाण तसेच ग्राहक सक्षमरित्या टिकवून ठेवल्यामुळे व्यवसायाला हातभार लागला आहे.
कृषी अवजारांसाठीच्या वित्तसहाय्यात यंदाच्या तिमाहीत वार्षिक तुलनेत 15% वाढ होऊन ते 30 जून 2023 ला संपलेल्यया तिमाहीत एक हजार 757 कोटी रुपयांवर झेपावले आहे. कृषीच्या उत्पादकतेत वाढ, किसान सुविधा टॉप-अप आणि रिफायनान्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या संख्येतील वाढ यामुळे या व्यवसायात वृध्दी दिसून आली आहे.