• 08 Jun, 2023 00:11

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kotak Mutual Fund: कोटक म्युच्युअल फंडची नवी स्कीम लाँच; जाणून घ्या डिटेल्स

Kotak Mutual Fund

कोटक म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांसाठी एक नवी योजना आणली आहे. Kotak NIFTY 200 Momentum 30 Index Fund असे या योजनेचे नाव आहे. हा एक ओपन एंडेड फंड असून सबस्क्रिप्शनसाठी 8 जूनपर्यंत खुला राहील.

Kotak Mutual Fund: कोटक म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांसाठी एक नवी योजना आणली आहे. Kotak NIFTY 200 Momentum 30 Index Fund असे या योजनेचे नाव आहे. हा एक ओपन एंडेड फंड असून सबस्क्रिप्शनसाठी 8 जूनपर्यंत खुला राहील. दीर्घकाळ गुंतवणुकीचे ध्येय असणाऱ्यांसाठी ही योजना चांगली ठरू शकते. 

दीर्घकाळ कंपन्यांमध्ये फंड हाऊस गुंतवणूक करणार 

 फंड खरेदी विक्रीसाठी अलॉटमेंटनंतर पाच दिवसांनी उपलब्ध होईल. हा फंड NIFTY 200 Momentum 30 Index वर आधारित असेल. तसेच देवेंद्र सिंघल, सतिश दौंडापती आणि अभिषेक बिसेन यांच्याकडून फंड व्यवस्थापित केला जाईल. गुंतवणुकीचे ध्येय साध्य करण्यासाठी हा फंड पॅसिव्ह पद्धतीने गुंतवणुकीची रणनीती आखणार आहे. म्हणजेच अल्पकाळात नफा न कमावता एखाद्या कंपनीत दिर्घकाळापर्यंत पैसे गुंतवण्यात येतील. गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी पोर्टफोलिओची पुनर्रचना करण्यावरही भर देण्यात येईल.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी 5 हजार रुपयांची मर्यादा आहे. त्यानंतर मासिक किंवा त्रैमासिक गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी 500 रुपये मर्यादा ठेवण्यात आली आहे. रेग्युलर आणि डायरेक्ट अशा दोन्ही मोडमध्ये हा प्लॅन उपलब्ध असेल.

योजनेची गुंतवणूक कशी असेल? 

या योजनेद्वारे 95-100% फंड इक्विटी मार्केट आणि इक्विटी संबंधित रोख्यांमध्ये गुंतवण्यात येईल. गुंतवणूक करण्यात येणाऱ्या कंपन्या NIFTY 200 MOMENTUM 30 इंडेक्समधील असतील. तर 0-5% गुंतवणूक डेट, मनी मार्केट पर्यायांमध्ये ठेवण्यात येईल.

योजना कोणासाठी योग्य राहील?

ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात संपत्ती निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना योग्य राहील. अल्पकाळात नफा कमावणाऱ्यांसाठी योजना योग्य राहणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. Nifty 200 Momentum 30 Index ला हा फंड ट्रॅक करेल. मात्र, जर इंडेक्स ट्रॅकिंगमध्ये चूक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. 

दरम्यान, मागील वर्षी म्युच्युअल फंड योजनांसाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने कोटक अॅसेट मॅनेजमेंट कंपनीला दंड केला होता. कंपनीचे संचालक निलेश शहा, मुख्य गुंतवणूक अधिकारी (डेट) लक्ष्मी अय्यर आणि इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना उल्लंघनप्रकरणी जबाबदार धरले होते. कोटक AMC ला 40 लाखांचा दंड आणि अधिकाऱ्यांनाही वेगळा दंड ठोठावला होता. त्यामुळे कोटक म्युच्युअल फंडचे बाजारमूल्य ढासळले होते.