Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO: कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला

www.en.wikipedia.or

Mutual Fund NFO: गृहनिर्माण क्षेत्र आणि ह्या क्षेत्राच्या विस्ताराचा लाभ होण्याची शक्यता असलेले उद्योग ह्यांचा फायदा घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांपुढे एक आकर्षक पर्याय ठेवण्याचे लक्ष्य कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंडापुढे आहे.

e कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनीची (केएमएएमसी) ‘कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड’ ही एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्सला अनुसरण करणारी फंड योजना गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. या फंडातील गुंतवणूक गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये केली जाणार आहे. ही योजना 07 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुली झाली असून 21 ऑगस्ट 2023 रोजी बंद होईल. 

एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स पात्र सामाईक इंडिया इंडस्ट्री क्लासिफिकेशनचा भाग म्हणून प्रवर्गीकृत करण्यात आलेल्या एसअँडपी बीएसई 250 लार्ज मिडकॅप इंडेक्समधील सामाईक समभागांचे मापन हा इंडेक्स करतो. ह्यातील घटकांचे मूल्यांकन तरलता-समायोजित (फ्लोट-अडजस्टेड) बाजार भांडवलाद्वारे केले जाते.  

या फंड योजनेत किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्यापुढे 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या योजनेत किमान 500 रुपयांपासून एसआयपी करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड आपल्या गृहनिर्माण क्षेत्राशी निगडित गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण गुंतवणूक संधी मिळवून देते. भारतीय शेअर बाजारातील गृहनिर्माण ह्या विभागाचा लाभ घेण्यासाठी हा फंड एक किफायतशीर व पारदर्शक दृष्टिकोन ठेवतो, असे कंपनीने म्हटले आहे.

या फंड योजनेबाबत ‘केएमएएमसी’चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा म्हणाले, जोखीम पत्करण्याची वेगवेगळी क्षमता असलेल्या तसेच विविध गुंतवणूक कक्षांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड हे उदाहरण आहे. 

गृहनिर्माण क्षेत्राच्या संभाव्य वाढीचा तसेच त्यामुळे भरभराट होऊ घातलेल्या अनेक व्यवसायांच्या प्रगतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा फंड गुंतवणुकीची अनन्यसाधारण संधी पुरवत असल्याचे शहा यांनी सांगितले.  

कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे ईव्हीपी आणि फंड व्यवस्थापक देवेंदर सिंघल म्हणाले, “जोखीम पत्करण्याच्या वेगवेगळ्या क्षमता असलेल्या तसेच वेगवेगळ्या कालखंडांसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना अनुकूल अशा योजना पुरवण्याच्या आमच्या अविरत प्रयत्नांतूनच कोटक एसअँडपी बीएसई इंडेक्स फंड बाजारात आला आहे. 

गृहनिर्माण क्षेत्र आणि ह्या क्षेत्राच्या विस्ताराचा लाभ होण्याची शक्यता असलेले उद्योग ह्यांचा फायदा घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांपुढे एक आकर्षक पर्याय ठेवण्याचे लक्ष्य ह्या फंडापुढे आहे.