Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rashtriya Arogya Nidhi Scheme: राष्ट्रीय आरोग्य निधी योजने अंतर्गत लाभ कोणाला मिळू शकतो, जाणून घ्या

Rashtriya Arogya Nidhi Scheme, Ministry Of Health And Family Welfare, ministry of health and family welfare

Rashtriya Arogya Nidhi Scheme: भारत सरकारच्या (Government of India) अनेक आरोग्य वैद्यकीय अनुदान योजना सुरू आहेत. यातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणजे राष्ट्रीय आरोग्य निधी योजना. सन 1977 पासून ही योजना सुरू आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

Rashtriya Arogya Nidhi Scheme: भारत सरकारच्या (Government of India) अनेक आरोग्य वैद्यकीय अनुदान योजना सुरू आहेत. यातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणजे राष्ट्रीय आरोग्य निधी योजना.  सन 1977 पासून ही योजना सुरू आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ही योजना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे (Ministry Of Health And Family Welfare) प्रशासित केली जाते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येतो.  सध्या या योजनेंतर्गत देशातील विविध राज्यातील १३ शासकीय सुपर स्पेशालिटी वैद्यकीय संस्थांमध्ये (Super Specialty Medical Institutions) २ लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळू शकतो. यावरील उपचारांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आर्थिक सहाय्य मिळते. राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधता येईल. राष्ट्रीय आरोग्य निधी योनेबद्दल अधिक  माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया.

राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेचे उद्दिष्ट objective

देशातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना गंभीर, जीवघेण्या आजारांनी ग्रासलेल्या आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेंतर्गत वैद्यकीय लाभासाठी रोगांच्या तीन भाग केले आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील हृदय, मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील रुग्णांसाठी प्रादेशिक कर्करोग केंद्रांवर (RCCS/टर्शरी केअर कॅन्सर सेंटर्स/राज्य कर्करोग संस्था) उपचार सुविधा उपलब्ध करून देणे. देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील दुर्मिळ आजाराने ग्रस्त रुग्णांना शासकीय रुग्णालय व शासकीय सुपर स्पेशालिटी संस्थेत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत करणे.

आर्थिक मदत Financial Aid

राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेंतर्गत, असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांना 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत सरकारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दिली जाते. या योजनेचा लाभ दिल्लीतील AIIMS, RML, सफदरजंग आणि लेडी हार्डिंगसह 14 केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान उपलब्ध आहे. त्याच वेळी, आरोग्य मंत्री विवेकाधीन अनुदान योजनेअंतर्गत 1.25 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

योजनेअंतर्गत रुग्णालयांची यादी List of hospitals under the scheme

  • राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेंतर्गत 13 सरकारी आरोग्य वैद्यकीय संस्थांमध्ये उपचाराचा लाभ मिळू शकतो 
  • दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटल (Ram Manohar Lohia Hospital)
  • एम्स, नवी दिल्ली (AIIMS, New Delhi)
  • लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली (Lady Hardinge Medical College, New Delhi)
  • श्रीमती सुचिता कृपलानी हॉस्पिटल, नवी दिल्ली (Smt. Suchita Kripalani Hospital, New Delhi)
  • पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, चंदीगड (Institute of Post Graduate Medical Education and Research, Chandigarh)
  • संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनौ (Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Sciences, Lucknow)
  • जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पुदुचेरी (Jawaharlal Institute of Post Graduate Medical Education and Research, Puducherry)
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बेंगळुरू (National Institute of Mental Health and Neurosciences, Bangalore)
  • चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्था, कोलकाता (Chittaranjan National Cancer Institute, Kolkata)
  • नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेस, शिलाँग (North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health and Medical Sciences, Shillong)
  • प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्था, इंफाळ (Regional Institute of Medical Sciences, Imphal)
  • शेरे काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, श्रीनगर (Shere Kashmir Institute of Medical Sciences, Srinagar)

उपचारासाठी आवश्यक कागदपत्रे Documents

  • रुग्णाच्या उपचाराशी संबंधित सर्व प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड 
  • आधार कार्ड

योजना अर्ज प्रक्रिया How To Apply For Rashtriya Arogya Nidhi

राष्ट्रीय आरोग्य निधी योजनेचा RAN अर्ज डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

https://main.mohfw.gov.in/sites/default/files/RAN_Guideline_2019.pdf
अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती भरल्यानंतर कागदपत्रांच्या झेरॉक्स  जोडाव्यात. त्यानंतर या योजनेंतर्गत सूचीबद्ध आरोग्य संस्थांपैकी तुम्हाला ज्या रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत, ते तेथे जमा करावे लागतील.