Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Strategy: कर वाचवण्यासाठी पती पत्नीच्या नावाने चालवतोय व्यवसाय? पडू शकते महागात!

Tax Strategy

Image Source : https://www.freepik.com/

अनेकदा पाहायला मिळते की कर वाचवण्यासाठी पतीकडून पत्नीच्या नाव वापरून व्यवसाय सुरू केला जातो. मात्र, यामुळे भविष्यात आर्थिक व कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकते.

भारतीय कुटुंबांमध्ये सर्वसाधारणपणे पुरुष आर्थिक निर्णय घेत असतात. स्त्रियांचा आर्थिक निर्णयातील सहभाग वाढला असला तरी आजही पुरुष व्यवसायापासून ते गुंतवणुकीपर्यंतचे सर्व निर्णय घेताना पाहायला मिळतात. अनेकदा घरातील महिलांचे बँक खाते देखील पुरुषांकडूनच हाताळले जाते.

एवढेच नाही तर पुरुषांकडून कर वाचवण्यासाठी पत्नी अथवा घरातील महिलांच्या नावाने व्यवसाय चालवला जातो. मात्र, महिलांच्या नावाने गुंतवणूक करणे व कर वाचविण्यासाठी त्यांच्या नावाने व्यवसाय चालवणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे भविष्यात आर्थिक व कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीमध्ये महिलांनी काय करायला हवे ? त्याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

पत्नीच्या नावाने व्यवसाय चालवण्याची ‘ही’ आहेत कारणे

कर वाचवणे

पती पत्नीच्या नावाने व्यवसाय चालवण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण हे कर वाचवणे हे असते. एकाच व्यक्तीच्या नावावर जास्त उत्पन्न असल्यास अशा स्थितीमध्ये जास्त कर भरावा लागतो. मात्र, याच उत्पन्नाचे पती व पत्नी अशा दोन व्यक्तीमध्ये विभागणी केल्यास कर वाचवता येतो. 

समजा, पतीचे उत्पन्न हे 10 लाख रुपये आहे. अशा स्थितीमध्ये पतीला जास्त कर भरावा लागतो. मात्र, या 10 लाखातील काही उत्पन्न पत्नीच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या व्यवसायातून आले असल्याचे दाखवल्यास कर भरावा लागणार नाही. मात्र, यामुळे भविष्यात कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. 

सरकारी व बँक योजनांचा फायदापत्नीच्या नावाने व्यवसाय चालवण्याचे आणखी एक कारण म्हणजे महिलांना मिळणाऱ्या सरकारी व बँक योजनांचा फायदा. अनेक बँका महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरासह कर्ज उपलब्ध करतात. याशिवाय, व्यवसायासाठी सरकारी योजनांमधून अनुदान देखील मिळते. त्यामुळे घरातील पुरुषांकडून महिलांच्या नावाने व्यवसाय सुरू केला जातो.

महिलांनी ‘या’ गोष्टींकडे द्यावे लक्ष

व्यवसायातील सहभाग वाढवावा पत्नी अथवा घरातील इतर स्त्रियांच्या नावाने व्यवसाय असला तरीही व्यवसायाचे सर्व अधिकार एकप्रकारे पुरुषांकडेच असतात. मात्र, भविष्यात कोणत्याही कारणांमुळे वाद निर्माण झाल्यास महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त व्यवसायाच्या कामात सहभागी होणे गरजेचे आहे. याशिवाय, व्यवसायाची आर्थिक बाजू समजून घेणे देखील गरजेचे आहे. याचा भविष्यात फायदा होऊ शकतो.
बनावट कागदपत्रेसर्वसाधारणपणे महिलांकडून घरातील पुरुषांच्या आर्थिक निर्णयावर सहज विश्वास ठेवला जातो. परंतु, कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी अथवा आर्थिक निर्णयाला होकार देण्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. पैशांच्या नावाखाली फसवणूक देखील होऊ शकते.
कर बुडवणे पडू शकते महागात

कर वाचवणे आणि कर बुडवणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही उत्पन्नाचे एकत्रीकरण दाखवून ( Clubbing of income ) कर वाचवू शकता. याशिवाय, इक्विटी गुंतवणूक, आरोग्य विमा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, एलटीए अशा विविध मार्गांनी जोडीदार एकत्र खर्च-गुंतवणूक दाखवून कर वाचवू शकतात.

परंतु, इतर व्यक्तीचे नाव वापरून व्यवसाय चालवणे व त्यातून कर बुडवणे यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. करचोरीच्या प्रकरणात आर्थिक दंडासह जेलमध्ये देखील जावे लागू शकते. 

सायबर गुन्हेगार उचलू शकतात फायदाकर वाचवण्याच्या नादात सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची देखील शक्यता आहे. सायबर गुन्हेगार कर बुडवल्याचे कारण देत तुम्हाला घाबरवू शकतात व यातूनच पुढे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कायदेशीर मार्गकोणतेही आर्थिक व कायदेशीर परिणाम टाळायचे असल्यास योग्य मार्ग वापरणे गरजेचे आहे. पती जर कर वाचवण्यासाठी महिलांच्या नावाने व्यवसाय चालवत असल्यास महिलेला याबाबत संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या कोणत्याही निर्णयाबाबत दोन्ही व्यक्तींमध्ये संवाद असणे आवश्यक आहे. याशिवाय, व्यवसायाची संयुक्त मालकी असल्यासही त्याचा फायदा होऊ शकतो.