Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fact Check: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेमागचं सत्य?

Government scheme

Fact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.

Pradhan Mantri Nari Shakti Yojana Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री नारी शक्ती योजना. या योजनेबाबत व्हिडिओ आणि माहिती प्रसारित झाली आहे. त्यामध्ये ‘सुनो दुनिया’ नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजना’ सुरू असल्याचे म्हटले आहे. या योजनेत सर्व महिलांना 52 हजार रुपये देण्यात येतील दावा करण्यात आला आहे. 

तंत्रज्ञानाची प्रगती झाली त्याचप्रमाणे क्राइमसुद्धा वाढीस लागले. अनेक फसवणुकीच्या घटना आपल्या कानावर येतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि बरेच काही App या माध्यमातून फेक व्हिडिओ आणि माहिती प्रसारित करून दिशाभूल केली जाते. घरबसल्या मिळालेली माहिती प्रत्येकाला हवी असते, म्हणून आपणही काहीवेळ त्यावर विश्वास ठेवून फसवणुकीचे बळी पडतो. 

व्हायरल व्हिडिओ मागील सत्यता काय? 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ खोटा आहे. पीबीआयने स्वतः त्याची पडताळणी केली असता ती माहिती खोटी असल्याचे म्हटले जात आहे. पीआयबीने ट्विट केले आहे की केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ नावाने कोणतीही योजना चालवली जात नाही. त्यामुळे ही योजना आणि त्यात प्रत्येक महिलेला 52 हजार रुपये देण्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. या योजनेशी संबंधित कोणतीही बातमी किंवा माहिती कोणत्याही वृत्तवाहिनी, वर्तमानपत्र किंवा संकेतस्थळावर आढळून आलेली नाही. हा व्हिडीओ कोणापर्यंत पोहोचतोय त्याचा गोंधळ होतोय हे उघड आहे, पण हा व्हिडीओ फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिशाभूल करणारा व्हिडिओ पसरवू नका

हा व्हिडीओ खोटा आणि बनावट असल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेकमधून स्पष्ट झाले आहे. याद्वारे काही फसवणुकीचा प्रयत्न केला जात असल्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये ज्या सरकारी योजनेचा दावा केला जात आहे त्याबद्दल सरकारने कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. तसेच या योजनेशी संबंधित कोणतीही बातमी किंवा माहिती कोणत्याही वृत्तवाहिनी, वर्तमानपत्र किंवा संकेतस्थळावर आढळून आलेली नाही. हा व्हिडीओ कोणापर्यंत पोहोचतोय त्याचा भ्रमनिरास होत आहे. त्यामुळे असे  तथ्यहीन व्हिडिओ कोणालाही फॉरवर्ड करू नका. 

(News Source: https://www.abplive.com)