Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akola News : कधी कमी होणार शेतकऱ्यांची चिंता? आधी अवकाळी पाऊस आणि आता विमा कंपनीने सुद्धा केली फसवणूक..

Farmer

Insurance Company Deceives Farmers : अवकाळी पावसासोबतच शेतकऱ्यांना अजून एक शॉक. विमा कंपनीकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Akola News: महाराष्ट्रातील अकोला शहरात नैसर्गिक आपत्तीत कमी नुकसान दाखवून विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणी 'आयआयसीआय लोम्बार्ड' या विमा कंपनीच्या 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

खरीप हंगाम 2022-23 मध्ये अकोला जिल्ह्यात 'प्रधानमंत्री पिक विमा योजना' (Pradhan Mantri Pik Bima Yojana) लागू करण्यासाठी ICICI लोम्बार्ड विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस, वाटाणा या पिकांचा विमा उतरवला आहे. 

नुकसान भरपाईबाबत जिल्हास्तरावर दर आठवड्याला सभा आयोजित करून शेतकऱ्यांच्या तक्रारीवर चर्चा सुरू झाल्या. या दरम्यान बार्शी टाकळी तालुक्यात नुकसान भरपाईचे एकाही शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यात निदर्शनास आली. 

नुकसानीची टक्केवारी चुकीची नोंदवली….. 

कंपनीने नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी चुकीची नोंदवली असल्याचेही समोर आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती अहवाल मागविण्यात आला होता. तक्रारीत म्हटले आहे की, 'आयसीआयसीआय लोम्बार्ड' कंपनीच्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींनी खोटे पंचनामे करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करून क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी कमी केली आहे.

अकोला जिल्हयातील  पडताळणी केलेल्या 127 अर्जांवर डुप्लीकेट सहया आहेत. विमा कंपनीने सर्वेक्षण अर्जांची संख्या 12 हजार 458 सांगितली, तर 14 हजार 608शेतकऱ्यांची 'क्लेम पेड' यादी सादर करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अवकाळी पावसाने केलेले अकोल्यातील नुकसान.. 

नुकत्याच झालेल्या पावसाने आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यानंतर विमा भरपाईची मागणी वाढली आहे. आधीच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने घेरले आणि आता त्यात ही फसवणूक अत्यंत गंभीर बाब आहे. तब्बल 4 कोटी रूपयांच्या जवळपास शेतकऱ्यांचा पैसा लंपास करण्याचा डाव विमा कंपन्यांचा होता. 

अकोला येथील बाब समोर आली म्हणून सगळ्यांना माहिती झाली. इतर ठिकाणी अशा घटना घडत असतात. पण काही कारणास्तव शेतकरी तक्रार करीत नाही आणि या सर्व बाबींना बळी पडतात. 

नेहमी शेतकाऱ्यांचीच परीक्षा का? 

अकोल्यात घडलेल्या घटनेबाबत इतर शेतकऱ्यांची महामनीने चर्चा केली असता, ते म्हणतात की, अवकाळी पाऊस, मिरचीवर रोग, बोंडअळी आणि इतर संकट फक्त शेतकऱ्यांवर का येतात? या सर्व नुकसानाची भरपाई सरकारने कबूल केली तर आता त्यातही समस्या.. 

शेतकाऱ्याने नेमक जगावं कसं? त्याला होणाऱ्या त्रास कोणीच का ग्राह्य धरत नाही. परमेश्वर सुद्धा अंत बघतो, आणि आता तर माणुसकी सुद्धा जीवंत दिसत नाही. मग शेतकाऱ्याने करावं तरी काय? आत्महत्या केली तर सगळे नावं ठेवतात. जगण्याची हिम्मत नाही, परिस्थितीला सामोरे जाण्याची हिम्मत केली असती तर आत्महत्या सुचली नसती. पण एकदा इतकी संकट एका वेळी आली तर आमच्याकडे उरणारा मार्ग हाच. शेतकऱ्यांच्या व्यथा न संपणाऱ्या आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात जातीने लक्ष दिले पाहिजे. अशीच मागणी आम्ही सरकारकडे करू शकतो. 

बँका शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात….. 

अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल पत्रकारांशी संवाद साधतांना अमोल मिटकरी यांनी सरकारने शेतकऱ्याला भरघोस मदत करावी याबद्दल सरकारकडे मागणी केली आहे. त्यात ते म्हणाले…..