Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: जाणून घ्या, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' काय आहे?

Government scheme

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: आता राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष देणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजेच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’. केंद्र सरकारकडून देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्याने 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. 

आता राज्य सरकारसुद्धा  केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष देणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतात, तितकेच पैसे आता राज्य सरकारही देणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जमा  करण्यात आला. या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान जमा केला जाऊ शकतो. 

आता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पीएम किसानच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांची रक्कम शेतकऱ्यांना देणार की, नंतर देणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबाना होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे  बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे, असे न केल्यास योजनेचा लाभ घेण्यास अडथळे येऊ शकतात.