उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. दुपारी घराबाहेर निघालं की उन्हांच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कामानिमित्त बाहेर गेल्यावर आता तर अंगाची लाही लाही होते आहे. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर घामेजलेल्या अवस्थेत लवकरात लवकर घरी पोहोचण्याची घाई आपण करतो आहोत. अशातच उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी घरी एसी (AC) घेण्याचा विचार अनेकजण करत असतील. पण एसी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.या लेखात याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
एअर कंडिशनर्सचेही अनेक प्रकार आहेत. एखाद्याच्या वापरावर आणि आवश्यकतेवर कुठला एसी घ्यावा हे ठरवले जाते. प्रत्येक एसीच्या डिजाईनमध्ये आणि वापरामध्ये फरक असतो हे लक्षात घ्या. उदाहरण द्यायचे झाले तर, घरासाठी वापरलेला एसी (AC for Domestic Use) आणि ऑफिसमध्ये वापरला जाणारा एसी (AC for Corporate Office) यात फरक आहे. विंडो एसी (Window AC), स्प्लिट एसी (Split AC), सेंट्रल (Central AC) आणि डक्टलेस (Ductless AC) यासारख्या वापरावर अवलंबून असलेल्या एसीचे अनेक प्रकार आहेत.
The Off Season Sale is here!
— Bajaj Electronics (@bajajelectronic) February 21, 2023
widest range of #ACs from top brands at great prices at your nearest #Electronicsmart store.
Visit today!#electronics #airconditioners #ac #bestdeals #hotsummer #summeressentials #summerneeds #airconditioner #airconditioning #cooling #technology pic.twitter.com/8qJqMVQUv3
घरगुती वापरासाठी विंडो एसी (Window AC) हा चांगला पर्याय असला तरी सध्या स्प्लिट एसी (Split AC) आणि कॅसेट एसीही (Cassette AC) घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. स्प्लिट एसी, विंडोज एसी पेक्षा जास्त ऊर्जा कार्यक्षम (Energy Efficient) आहेत. त्यामुळे, उन्हाळ्याच्या महिन्यात तुमचे वीज बिल कमी करायचे असल्यास, स्प्लिट एसी किंवा विंडो एसी निवडा.
शक्य असल्यास, ऊर्जा कार्यक्षम उपकरण निवडा. अग्रगण्य ब्रँड उत्पादकांनी भारतातील उच्च मध्यमवर्गीयांच्या गरजा लक्षात घेऊन बाजारपेठेत स्प्लिट एसीच्या अनेक नवीन श्रेणी लॉन्च केल्या आहेत. ही उपकरणे एनर्जी स्टार (Energy Star) लेबलसह बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्ही चांगल्या ब्रँडचा एसी वापरलात तर साधारण एसीच्या तुलनेत सात ते दहा टक्के विजेची बचत होत असते हे लक्षात घ्या.
जर तुम्ही एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यात गुंतवणूक करत असाल तर सेकंडहँड एसी घेणे शक्यतो टाळा. सेकंड हँड एसीमध्ये तुम्हाला त्याची वॉरंटी मिळत नाही आणि वारंवार त्यात कामे निघतात.
आजकाल अनेक पर्यायांसह नवीन एसी खरेदी करणे सोपे झाले आहे. एसी खरेदी आणि तो बसवण्याचा खर्च आणि नवीन वीज बिलांची तुलना केल्यास एसी भाड्याने घेण्यापेक्षा तो खरेदी केल्यास जास्त बचत होते हे दिसून येईल.
AC तपशीलांकडे अधिक लक्ष द्या!
वॉरंटी तपासा: सामान्यत: विंडो एसीमध्ये सात ते आठ वर्षांची वॉरंटी असते. त्यामुळे अगदी पाच वर्षांची वॉरंटी मिळाली तरी, तुमच्या गुंतवणुकीचा योग्य विचार करा.
AC उपकरणे ऊर्जा कार्यक्षम आहेत का ते तपासा आणि तसे असल्यास, खोलीचे तापमान 23°C ते 25°C दरम्यान ठेवा. तापमान जितके कमी असेल तितकी जास्त वीज लागेल, हे गणित AC चालवताना कायम लक्षात ठेवा. एअर कंडिशनर खोलीत योग्य ठिकाणी स्थापित केले पाहिजे. साधारणपणे, एसी खोलीत उंचावर लावले जातात. एसी रिमोट कंट्रोलमुळे उंचीवर जरी एसी लावला तरी तो तुम्ही सहज हाताळू शकता.एसी असलेल्या खोलीतील पडदे शक्यतो जाड आणि गडद रंगाचे असावेत. त्यामुळे बाहेरील उष्णतेचा परिणाम खोलीवर होणार नाही व लवकरात लवकर तुमची खोली थंड होईल. सोबतच जास्त वेळेपर्यंत गारवा टिकून राहील.
एसीची सर्व्हिसिंग प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक असते. केवळ उन्हाळ्यात एसी चालवून पावसाळा आणि हिवाळ्यात जर तुम्ही तो बंद ठेवत असाल तर त्यात बिघाड होऊ शकतो. एसी हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे हे लक्षात घ्या. जशी एखादी गाडी बराच कालावधीसाठी विनावापर उभीच राहिली तर ती चालू होत नाही, तशीच परिस्थिती एसीच्या बाबतीतही अनुभवायला मिळू शकते हे लक्षात घ्या. दररोज किमान 5 मिनिट तरी एसी सुरू करावा जेणेकरून त्याचे मशीन सुस्थितीत राहील.
तुम्ही गुंतवणूक करत असलेली सेवा तुम्हाला मिळत असल्याची खात्री करा. प्राधान्याने ब्रँडेड उपकरणे निवडा, ज्यात ऊर्जा बचत आणि इतर सावधगिरी बाळगण्याची अधिक क्षमता आहे. नॉन-ब्रँडेड एसी ऊर्जा वाचवू शकत नाहीत हे लक्षात घ्या.