शेअर बाजारात सध्या घसरण पाहायला मिळतेय. अशा परिस्थितीत कमाईच्या हेतूने तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना मिडकॅपमधून 3 स्टॉक निवडून दिले आहेत. आनंद राठी सिक्युरिटीजचे सिद्धार्थ सेदानी यांनी सोनाटा सॉफ्टवेअर (Sonata Software), स्टायलम इंडस्ट्रीज (Stylam Industries) आणि गॅब्रिएल इंडियाची (Gabriel India) गुंतवणूकदारांसाठी साधारणपणे 3 ते 12 महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली. या स्टॉक्सनी (Stock) वर्षभरात दुप्पट आणि तीन वर्षांत जवळपास सहापट परतावा दिलाय. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय. पाहूया याच समभागांविषयी...
गॅब्रिएल इंडिया टार्गेट प्राइज (Gabriel India target price)
सिद्धार्थ सेदानी यांनी लॉन्ग टर्मसाठी गॅब्रिएल इंडियाची निवड केलीय. कंपनी अॅब्सॉर्बर तयार करते. वंदे भारत ट्रेनसाठी कंपनीनं शॉक अॅब्सॉर्बर बनवण्याचं कामही सुरू केलंय. चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले होते. निव्वळ नफ्यात 26 टक्क्यांची तर विक्रीत 7.69 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. कंपनीच्या मार्जिनमध्येही सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. तज्ज्ञांनी पुढच्या 9-12 महिन्यांसाठी 226 रुपयांचं लक्ष्य दिलंय. बुधवारी शेअर 173 रुपयांवर बंद झाला होता. टार्गेट प्राइज 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या समभागानं एका वर्षात 60 टक्के आणि तीन वर्षात जवळपास 140 टक्के परतावा दिलाय.
स्टायलम इंडस्ट्रीज टार्गेट प्राइज (Stylam Industries target price)
मीडियम टर्मसाठी स्टायलम इंडस्ट्रीजला प्राधान्य दिलं जातं. 3-6 महिन्यांसाठी पोझिशनल म्हणजेच मध्यम मुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येतो. 1770 रुपयांचं टार्गेट आहे. टार्गेट प्राइज बुधवारच्या क्लोजिंगच्या तुलनेत 10 टक्क्यांहूनही जास्त आहे. बांधकाम साहित्य निर्माण करणारी ही कंपनी आपली विविध उत्पादनं 80पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. कंपनीचा बाजारातला हिस्सा 6 टक्क्यांहून जास्त आहे. क्षमता विस्तारासाठी तयार आहे. आर्थिक वर्ष 2025पर्यंत कंपनीचा महसूल दुप्पट होऊ शकतो, असं कंपनी व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. या स्टॉकनं वर्षभराच्या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
सोनाटा सॉफ्टवेअर टार्गेट प्राइज (Sonata Software target price)
सोनाटा सॉफ्टवेअर शॉर्ट टर्म निवडीसाठी सांगितला जातो. साधारणपणे 1-3 महिन्यांच्या गुंतवणूकदारांसाठी आहे. या कंपनीनं मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी जाहीर केलीय. शॉर्ट टर्म टार्गेट 980 रुपये देण्यात आलंय. बुधवारच्या क्लोजिंगच्या तुलनेत 6 टक्क्यांनी ते जास्त आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. एका वर्षात 90 टक्के आणि तीन वर्षात 525 टक्के बंपर असा परतावा या स्टॉकनं दिलाय. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 10.65 टक्के वाढ झाली. तर निव्वळ विक्री 19.35 टक्क्यांनी वाढली.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)