Government Scheme for Disability: सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे निराधार, विधवा, शेतकरी, विद्यार्थी, तरुण या सर्वांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा सरकारकडून अनेक सोईसुविधा आणि योजना राबविल्या जातात. शरीराने धडधाकट असलेला व्यक्ती मेहनत करून दोन वेळचे जेवण करू शकतो पण दिव्यांगांच्या बाबतीत असे नाही.
हात नसताना स्वतःच्या पायाने लिहून तहसीलमध्ये एक कर्मचारी म्हणून दिव्यांग व्यक्ती काम करत आहे याकडे लोक कुतूहलानेच बघतील. त्यांच्या याच जिद्दीला लक्षात घेऊन सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांग व्यक्तींना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. ते पुढीलप्रमाणे,
लोकांचे आरोग्य लक्षात घेता सरकारकडून मुळातच दिव्यांगत्व येऊ नये म्हणून दिव्यांग प्रतिबंधात्मक कार्यक्रम, दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, शालेय आरोग्य तपासणी, जनजागृती, माता बाल संगोपन कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वेयक्तिक स्वच्छता व आरोग्य इत्यादी कार्यक्रम आरोग्य विभागामार्फत राबविले जातात.
Table of contents [Show]
- दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण
- योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
- शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
- दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव म्हणून स्वयंरोजगारासाठी भांडवल
- अटी व शर्ती
- दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र 2023
- दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभ कोणते?
- अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- दिव्यांग पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करावा?
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण
दिव्यांग विद्यार्थी सामान्य मुलांबरोबर शाळेत येऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळांमधून दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांगांसाठी शिक्षणाची सोय केली जाते. या शाळा निवासी व अनिवासी स्वरुपाच्या असून निवास, जेवणाची विनामुल्य सोय तिथे दिली जाते.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
- वय वर्षे 6 ते 18 असणे आवश्यक आहे.
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकाकडून दिलेले असावे.
- अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगत्व 40% हून अधिक असेल तर.
- कर्णबधिर विद्यार्थ्यांची ऐकण्याची क्षमता 26 ते 91 किंवा त्याहून अधिक डी.बी. असेल तर
- अंध विद्यार्थी दोन्ही डोळयांनी अंध असेल तर.
- मतिमंद विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक 70 हून कमी असेल तर.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी करावा.
शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सामान्य शाळेमध्ये किंवा स्पेशल दिव्यांगांच्या अनिवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपये इयत्ता पाचवी ते सातवी दरमहा 75 रुपये इयत्ता नववी ते दहावी दरमहा 100 रुपये त्याचबरोबर मतिमंदांच्या विशेष अनिवासी शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांना दरमहा 75 रुपये या दराने शिष्यवृत्ती दिली जाते.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी
- अर्जदार 10 वी पर्यंत कोणत्याही वर्गात शिक्षण घेणारा असेल तर
- मतिमंद विद्यार्थी समाज कल्याण विभागाच्या मान्यताप्राप्त अनिवासी शाळेचा विद्यार्थी असेल तर
- त्याचा बुद्ध्यांक 70% हून कमी असेल तर
- अर्जदार एकाच वर्गात एकापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद
- अर्जासोबत वार्षिक परिक्षेची गुणपत्रिका व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे
- या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा राहणार नाही.
या योजनेसाठी संपर्क संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी करावा.
दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव म्हणून स्वयंरोजगारासाठी भांडवल
18 ते 50 वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिविकलांग दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 1,50,000 च्या व्यवसायाकरीता 80% बँकेमार्फत कर्ज व 30,000 अनुदान स्वरुपात दिले जाते.
अटी व शर्ती
- अर्जदाराचे दिव्यांगत्व किमान 40% त्यापेक्षा जास्त असेल तर
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी पुणे जिल्हयातील रहिवासी असावा.
या योजनेसाठी संपर्क संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी करावा.
दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र 2023
दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र 2023 चा उद्देश काय?
दिव्यांग व्यक्ती स्वतःचे दैनंदिन जीवन जगताना अनेक संकटांना सामोरे जातात. तसेच त्यांना दिव्यांगत्वामुळे परावलंबी बनावे लागते, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वबळावर आणि सन्मानान जगण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत करणे, हे या योजनेचे उद्देश्य आहे.
दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभ कोणते?
- महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रतिमहा 600 रुपयांची पेन्शन देणार आहे.
- 80 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
- त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे.
अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- ओळखपत्र
- वय प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
दिव्यांग पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करावा?
- तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
- या कार्यालयांमध्ये तुम्हाला दिव्यांग पेन्शन योजनेचा फॉर्म मिळेल.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून,
- ती तुम्हाला जिल्हाधिकारी /तहसीलदार/तलाठी यापैकी कोणत्याही एक कार्यालयामध्ये जमा करावी लागतील.
- तुमचा फॉर्म या कार्यालयांमध्ये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची चेकिंग केली जाईल.