Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या सेवानिवृत्ती योजनांचे विविध पर्याय!

retirement plans government scheme

निवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.

आपल्यापैकी प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे आणि गरजा ही भिन्न आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीचा विचार करताना आपल्या गरजांनुसार सेवानिवृत्ती योजनांची निवड करणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या कोणत्या टप्प्यावर निवृत्त व्हायचे आहे, हे ठरवणं आवश्यक आहे. तसेच निवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे. अशाच काही निवृत्ती योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS)

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) सरकारने सादर केलेली सेवानिवृत्तीसह निधी योजना आहे. एनपीएस (NPS) मध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना कर बचत आणि सेवानिवृत्ती नियोजनाचा दुहेरी लाभ मिळतो. एनपीएस खात्यासाठीचे योगदान कलम 80सी अंतर्गत वजावटीच्या मार्गाने व्यक्तींना लाभ देते. हे केवळ सेवानिवृत्तीचे नियोजन सुरक्षित करत नाही; तर वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर बचतीची सवलत देते. या निवृत्तीनियोजन योजनेत खाजगी आणि सरकारी कर्मचारी दोघेही गुंतवणूक करू शकतात, ही एक सकारात्मक बाब आहे.

‘एनपीएस’साठी पात्रता 

एनपीएस योजनेसाठी 18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. NPS खात्यात गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम मर्यादा 1 हजार रूपये आहे.

एखाद्या व्यक्तीला कलम 80CCD (1B) अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त कर सवलत याद्वारे मिळू शकते. ती व्यक्ती NPS मध्ये योगदान दिलेल्या त्याच्या वेतनाच्या 20 टक्क्यांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकतो. विशेष म्हणजे NPS वर मिळणाऱ्या परताव्यांना करातून सूट देण्यात आली आहे. गुंतवणूकदार निवृत्त झाल्यावर किंवा 60 वर्षे पूर्ण झाल्यावर ही योजना मॅच्युर्ड (Maturity) होते. मॅच्युरिटी झाल्यावर संबंधित व्यक्ती खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 60 टक्के रक्कम काढू शकते; तर उर्वरित 40 टक्के रक्कम वार्षिकी योजना खरेदी करण्यासाठी वापरली जाते.

‘एनपीएस’वर मिळणारे व्याज 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी (VPF) च्या तुलनेत एनपीएस (NPS)वर परतावा निश्चित नाही. या योजनेतून मिळणारा परतावा हा बाजारावर आधारित असतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) हा सरकार समर्थित सेवानिवृत्ती लाभ कार्यक्रम आहे. निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचा नियमित प्रवाह सुनिश्चित करून ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे तिमाही आधारावर परताव्याची हमी देते. भारतातील प्रमाणित बँका आणि पोस्ट ऑफिसमधून SCSS चा लाभ घेता येतो. उच्च निश्चित परतावा आणि त्रैमासिक आधारावर नियमित उत्पन्न शोधत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना SCSS अनुकूल आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी पात्रता 

60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले भारतातील ज्येष्ठ नागरिक
ज्यांचे वय 55 ते 60 या दरम्यान असून त्यांनी स्वेच्छेने सेवानिवृत्ती (VRS) निवडली
50 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी
हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि अनिवासी भारतीय (NRI) यांना यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही
सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक करणे आवश्यक

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा गुंतवणुक कालावधी 5 वर्षे आहे; तो आणखी 3 वर्षे वाढवण्याचा पर्याय आहे. SCSS ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक आहे. एफडी किंवा बचत खात्याशी तुलना केल्यास उच्च परतावा देते आणि त्याच वेळी ते रु. 1.5 लाखांपर्यंत कर लाभ देते. एकूण मर्यादा 15 लाख रुपये आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत मिळविलेले व्याज पूर्णपणे करपात्र असते आणि ते इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात जोडले जाते. 

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर मिळणारे व्याज 

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (SCSS) सध्या वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळते. हा व्याजदर 31 मार्च, 2022 पर्यंतचा आहे.

अटल पेन्शन योजना (APY)

अटल पेन्शन योजना (APY) 9 मे 2015 रोजी सर्व भारतीयांसाठी, विशेषत: गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारने सुरू केली. APY पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे प्रशासित केली जाते.

अटल पेन्शन योजने (APY)साठी पात्रता

देशातील असंघटित क्षेत्रातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बचत बॅंक खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन दिली जाते. एखादा गुंतवणूकदार वयाची 60 वर्षे पूर्ण करण्याअगोदरच मरण पावला तर त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळते.

या योजनेतील सदस्यांना हमी दिलेली किमान मासिक पेन्शन वयाच्या 60व्या वर्षी मिळते. पेन्शन म्हणून योजनेतील नियमानुसार 1 हजार रूपये किंवा 2 हजार रूपये किंवा 3 हजार रूपये किंवा 4 हजार रूपये किंवा 5 हजार रूपये रकमेचा समावेश असू शकतो. मासिक पेन्शन सबस्क्रायबरला उपलब्ध असेल आणि त्याच्या नंतर त्याच्या जोडीदाराला आणि त्यांच्या मृत्यूनंतर, पेन्शन कॉर्पस, सबस्क्रायबरच्या वयाच्या ६० व्या वर्षी जमा होईल, तो गुंतवणूकधारक वारसाला (nominee) परत केला जाईल.

योजनेतील सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास (वयाच्या 60 वर्षापूर्वी मृत्यू), ग्राहकाचा जोडीदार, मूळ ग्राहकाचे वय 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत, उर्वरित कालावधीसाठी, गुंतवणूकदाराच्या APY खात्यात योगदान चालू ठेवू शकतो. किमान पेन्शनची हमी सरकारद्वारे दिली जाते. योगदानावर आधारित जमा झालेला निधी गुंतवणुकीवरील अंदाजे परताव्यापेक्षा कमी कमावत असेल आणि किमान हमी पेन्शन प्रदान करण्यासाठी अपुरा असेल तर सरकार अशा अपर्याप्ततेसाठी निधी देते. वैकल्पिकरित्या गुंतवणुकीवरील परतावा जास्त असल्यास ग्राहकांना वर्धित पेन्शनरी फायदे मिळतील. APY मध्ये सदस्य हे मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक आधारावर निधी योगदान करू शकतात. सरकारी सह-योगदानाची वजावट आणि त्यावरील परतावा/व्याज यावर काही अटींच्या अधीन सदस्य स्वेच्छेने APY मधून बाहेर पडण्याची सुविधा आहे.

कमी होत जाणाऱ्या बचतीवरील व्याजदर लक्षात घेता स्थिर उत्पन्न देणाऱ्या आणि तुलनेत कमी जोखीम असलेल्या पर्यायांकडे गुंतवणूकदारांनी पाहणे आवश्यक आहे. अस्थिर उत्पन्नाच्या कालावधीत अशा पर्यायांची नितांत गरज असते.