Life Insurance Corporation of India म्हणजेच एलआयसी(LIC)ने आपल्या ग्राहकांसाठी प्रथमच इंटरअॅक्टीव्ह व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली. ज्या पॉलिसीधारकांनी किंवा ग्राहकांनी एलआयसीच्या ऑनलाईन पोर्टलवर (LIC Online Portal) रजिस्टर्ड केल्या आहेत. ते ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतात. युलिप प्लॅनचे स्टेटमेंट आणि याव्यतिरिक्त एलआयसीच्या वेगवेगळ्या सेवा व्हॉट्सअॅप चॅटबॉक्स वापरता येणार आहेत.
एलआयसीच्या अधिकृत स्टेटमेंटनुसार, ज्या पॉलिसीधारकांनी अद्याप ऑनलाईल पोर्टलवर आपल्या पॉलिसी रजिस्टर्ड केलेल्या नाहीत. त्यांनी सर्वप्रथम इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर रजिस्टर्ड करणे गरजेचे आहे. तसेच पॉलिसीधारक एलआयसीचे कस्टमर पोर्टल www.licindia.in या वेबपोर्टलवरसुद्धा रजिस्टर्ड करू शकतात. एकदा तुम्ही वेबपोर्टल किंवा इन्स्टंट अॅपवर पॉलिसी रजिस्टर्ड केली असेल तर खालीलप्रमाणे तुम्ही टप्प्या टप्प्याने एलआयसी व्हॉट्सअॅप सर्व्हिस सेवा वापरू शकता.
LIC WhatApp Service अशी सुरू करा!
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये एलआयसीचा 8976862090 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करा.
- तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप ओपन करा आणि LIC of Indiaचा व्हॉट्सअॅप चॅट बॉक्स ओपन करा.
- मोबाईलमधून त्या क्रमांकावर Hi असा मॅसेज पाठवा.
- LIC कडून तुम्हाला 11 पर्याय पाठवले जातील. त्यातून तुम्ही तुमचा पर्याय निवडा.
- आलेल्य पर्यायातून तुम्हाला हवा असलेल्या पर्यायाचा क्रमांक निवडा. उदाहरणार्थ, 1 क्रमांक प्रीमिअम भरण्याची दिनांक किंवा क्रमांक 2 बोनसची माहिती.
- LIC तुम्ही निवडत असलेल्या पर्यायानुसार त्याची माहिती व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल.
तुम्ही रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून LIC Customer Portal वर मॅसेज पाठवा. जर तुम्ही दुसऱ्या मोबाईल नंबरने रजिस्टर्ड केले असेल तर तुमचा व्हॉट्सअॅप नंबर अपडेट करा. तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा माहिती ebiz.licindia.in/D2CPM/#Login या पोर्टलवरून अपडेट करू शकता.
LIC WhatsApp Serviceवर उपलब्ध असलेल्या सेवा
- प्रीमिअम भरण्याची अंतिम तारीख
- बोनसची माहिती
- पॉलिसी स्टेट्स
- कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता
- कर्ज रिपेमेंट करण्याची प्रक्रिया
- कर्जाचा व्याजदर
- प्रीमिअम भरल्याची पावती/सर्टिफिकेट
- ULIP – युनिट स्टेटमेंट
- LIC सर्व्हिस लिंक
- ऑप्शन इन / ऑप्शन आऊट सर्व्हिस
LIC पोर्टलवर रजिस्टर कसे करायचे?
- www.licindia.in या वेबपोर्टला भेट द्या.
- आता पोर्टवरील कस्टमर पोर्टल या पर्यायावर क्लिक करा आणि ओपन करा.
- तुम्ही जर नवीन युझर असाल तर, New User यावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
- आता तुमचा आयडी आणि पासवर्ड (User ID & Password) सिलेक्ट करा आणि सर्व माहिती सबमिट करा.
- आता पोर्टवरील लॉगिन हा पर्याय निवडून लॉगिन करून घ्या.
- लॉगिन केल्यानंतर Basic Services मध्ये Add Policy वर क्लिक करा.
- इथे तुमच्या पॉलिसीची माहिती टाका आणि तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.