Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड म्युच्युअल फंडमधील फरक जाणून घ्या!

Open Ended & Closed Ended Mutual Fund

Open Ended & Closed Ended Mutual Fund : ओपन एंडेड फंडमध्ये गुंतवणूकदार कधीही गुंतवणूक आणि विक्री करू शकतात. पण क्लोज एंडेड फंडमध्ये असे होत नाही. क्लोज एंडेड फंडमध्ये फक्त नवीन फंड ऑफर (एनएफओ) द्वारेच गुंतवणूक करता येते.

प्राथमिक दर्शनी म्युच्युअल फंडमधील (Mutual Fund) गुंतवणुकीच्या स्ट्रक्चरनुसार म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार पडतात. जेव्हा म्युच्युअल फंड हाऊस गुंतवणूकदारांसाठी नवीन योजना मार्केटमध्ये आणतात. तेव्हा त्या योजनेला न्यू फंड ऑफर (New Fund Offer-NFO) म्हटले जाते. या कालावधीत तुम्ही त्या योजनेमध्ये एनएफओ म्हणून गुंतवणूक करू शकता. पण जेव्हा एनएफओचा कालावधी संपतो. तेव्हा फंड हाऊस गुंतवणूकदारांना त्या योजनेमध्ये खरेदी करण्याची परवानगी देत नाहीत. अशावेळी म्युच्युअल फंडमधील ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड म्युच्युअल फंड यांच्यातील फरक स्पष्ट होतो. आज आपण Open Ended and Closed Ended Mutual Fund मधील फरक आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड फंडमधील फरक

ओपन एंडेड म्युच्युअल फंड

क्लोज एंडेड म्युच्युअल फंड

गुंतवणूकदाराला वाटेल तेव्हा गुंतवणूक किंवा त्यातून बाहेर पडता येते. फक्त  ELSS स्कीम्ससाठी 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो.

फंड हाऊसचा  NFO येतो तेव्हाच या स्कीम्समध्ये गुंतवणूक करता येते. तर लॉक-इन पीरिअड संपल्यानंतर त्यातून बाहेर पडता येते.

या स्कीममधील निधी स्टॉक एक्सचेंजवर मुक्तपणे वापरला जातो.

या स्कीम्समधील काही टक्केच निधीचा वापर स्टॉक एक्सचेंजमध्ये केला जातो.

या स्कीममधून जारी करण्यात आलेल्या युनीट्सची संख्या अमर्यादित असते.

जारी केलेल्या युनीट्सची संख्या निश्चित असते.

यामध्ये एकरकमी किंवा  SIP द्वारे गुंतवणूक करता येते.

यामध्ये फक्त एकरकमी गुंतवणूक करता येते. या फंडमध्ये  SIP द्वारे गुंतवणूक करता येत नाही.

ELSS गुंतवणुकीवर टॅक्स लाभ मिळतो

यामध्ये गुंतवणुकीवर कोणतीही टॅक्स सवलत मिळत नाही.

स्कीम्सच्या मागील परफॉर्मन्सवर आधारित त्याची तुलना किंवा अॅनालिसिस करता येते.

या स्कीममधील मागील कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे या स्कीम्सची तुलना किंवा अॅनालिसिस करणे शक्य नाही.

या स्कीम्समधील फंडचा  NAV दिवसभराच्या पोर्टफोलिओनुसार दररोज बदलतो.

या स्कीम्समधील फंडचा  NAV एनएफओच्या वेळी ठरवला जातो. तसेच ही स्कीम संपली की शेवटच्या तारखेला याचा  NAV पुन्हा जाहीर केला जातो.

ओपन एंडेड फंडमधील पोर्टफोलिओवर फंड मॅनेजरचे मर्यादित नियंत्रण असते. 

क्लोज एंडेड फंडमधील पोर्टफोलिओवर फंड मॅनेजरचे पूर्णत : नियंत्रण असते. 

ओपन एंडेड फंडचा  AUM-Assets Under Management सतत बदलत असतो. 

क्लोज एंडेड फंडमध्ये  AUM स्टेबल असतो.

ओपन एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे काय? What is Open Ended Mutual Fund?

ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजना अशी म्युच्युअल फंड योजना आहे. यात फंडच्या युनीट्सच्या संख्येवर बंधने नाहीत. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना थेट म्युच्युअल फंड हाऊसकडून खरेदी–विक्री करता येते. गुंतवणूकदार मागील एनएव्हीच्या आधारे युनीट्सची खरेदी-विक्री करू शकतात. तसेच एनएफओचा कालवधी संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना यामध्ये युनीट्स विकत घेता येतात किंवा विकता येतात.

क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे काय? What is Closed Ended Mutual Fund?

क्लोज एंडेड म्युच्युअल फंड हे ओपन एंडेड म्युच्युअल फंडच्या अगदी विरूद्ध अशी योजना आहे. म्हणजे या स्कीम्समध्ये फक्त NFO कालावधीतच गुंतवणूक करता येते. एनएफओ कालावधीत म्युच्युअल फंड हाऊसकडून ठराविक युनीट्स जारी केले जातात. याचा पोर्टपोलिओ व्हॉल्यूम फिक्सड् असल्यामुळे एनएफओ कालावधी बंद झाल्यावर या स्कीम्समध्ये नव्याने गुंतवणूक करता येत नाही.

ओपन एंडेड म्युच्युअल फंडचे फायदे आणि तोटे

फायदे

  • गुंतवणूक आणि रिडिम्शनसाठी पूर्णत: फ्लेक्सीबल
  • हाय लिक्विडिटी
  • तुमच्या गुंतवणुकीवर पूर्णत: कंट्रोल
  • ELSS स्कीम अंतर्गत टॅक्स सवलत
  • SIP आणि Lumsum गुंतवणूक करता येते
  • मागील वर्षांचा परफॉर्मनन्स पाहून निर्णय घेता येतो

तोटे

  • मुदतीपूर्वी गुंतवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर एक्सिट लोड लागू शकतो
  • रिडम्शनमुळे तुमच्या पोर्टपोलिओवर परिणाम होऊ शकतो.
  • फंड मॅनेजर्सचे अशाप्रकारच्या फंडवर मर्यादित नियंत्रण असते
  • या स्कीममध्ये शॉर्ट-टर्म गेन अंतर्गत जास्त टॅक्स लागू शकतो.

क्लोज एंडेड म्युच्युअल फंडचे फायदे आणि तोटे

फायदे

  • या स्कीम्समध्ये ब्रोकरच्या मदतीने मार्केटमधील लाईव्ह किमतीनुसार युनीट्सची खरेदी-विक्री करू शकता 
  • या स्कीमची मॅच्युरिटी झाल्यावरच गुंतवणूक केलेली रक्कम रिडीम करता येते
  • या प्रकारच्या फंडमधील फंड मॅनेजरकडे अधिक लवचिकता आणि स्वातंत्र्य असते
  • दीर्घकालीन गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत

तोटे 

  • एनएफओ कालावधीनंतर गुंतवणूक करू शकत नाही 
  • फक्त एकरकमी गुंतवणूक करता येते. SIP चा पर्याय उपलब्ध नाही
  • गुंतवणूक करण्यापूर्वी मागील रेकॉर्ड पाहण्याची सुविधा उपलब्ध नाही

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही पूर्णपणे गुंतवणूकदाराची गरज आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराला अधिक काळ गुंतवणूक करायची असेल तर ते क्लोज एंडेड फंडची निवड करू शकतात. ज्यामळे गुंतवणूकदाराला कम्पाऊंडिग इंट्रेस्टचा लाभ मिळू शकतो. तसेच क्लोज एंडेड फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकरकमी रक्कम गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.