Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning: नोकरी जाण्याची भिती वाटतेय? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास अडचणीच्या काळातही येणार नाही आर्थिक समस्या

financial planning

Image Source : https://www.freepik.com/

मंदीमुळे कर्मचारी वर्गाला नोकरी गमविण्याची मोठी भिती वाटते असते. मात्र, योग्य आर्थिक नियोजन केल्यास नोकरी नसतानाही कोणतीही समस्या येणार नाही.

जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे, अशी चर्चा आपण सातत्याने ऐकत असतो. मंदीमुळे कर्मचारी वर्गाला नोकरी गमविण्याची मोठी भिती वाटते असते. खासकरून, करोना व्हायरस महामारीच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. गेल्या वर्षभरात भारतासह जगभरातील अनेक कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात नोकरीची हमी कोणीही देऊ शकत नाही. परंतु, नोकरी गेल्यास कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी आधीच पावले मात्र उचलता येतात.    

नोकरी गमवल्यावर अनेक आर्थिक अडचणींना समोरे जावे लागते. वाढलेली महागाई, कमी उत्पन्न यामुळे भविष्याची चिंता देखील अनेकांना सतावत असते. अशा स्थितीमध्ये योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यास  कोणत्याही स्थितीमध्ये तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावणार नाहीत. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.    

भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स -    

गुंतवणूक करा – तुम्हाला जर भविष्यात नोकरी गमावण्याची भिती वाटत असल्यास आधीपासूनच गुंतवणुकीस सुरुवात करा. तुम्ही आतापासूनच तुमच्याकडे जमा असलेली रक्कम बँकेत फिक्स्ड डिपॉजिट म्हणून ठेवू शकता. या रक्कमेचा फायदा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणीच्या काळात होऊ शकतो.    

इमर्जेंसी फंड – तुम्ही भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही स्थितीसाठी आधीपासून तयार असायला हवे. त्यासाठी तुम्ही आतापासूनच तुमच्या पगारातील ठराविक रक्कम इमर्जेंसी फंड स्वरूपात बाजूला काढून ठेवू शकता. समजा, तुमचा महिन्याचा पगार 25 हजार आहे. यातील 5 हजार रुपये तुम्ही दरमहिना इमर्जेंसी फंड म्हणून बाजूला काढू शकता. याशिवाय,  मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरखर्च अशी विभागणी करून पैसे शिल्लक ठेवल्यास भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल.    

खर्चाचा आराखडा – दरमहिना होणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे, त्याबाबत नोंद करणे ही खूपच चांगली सवय आहे. तुम्ही आतापासून दरमहिन्याला घर-गाडीचा हप्ता, मुलांचे शिक्षण, आरोग्य व इतर गोष्टींवर होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवू शकता. यामुळे तुम्हाला  अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल व बचतीमध्ये वाढ होईल.    

विमा खूपच महत्त्वाचा – तुमच्या व तुमच्या कुटुंबाचा आरोग्य विमा असणे खूपच आवश्यक आहे. तुम्ही नोकरी करत असतानाच संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा काढू शकता. यामुळे भविष्यात हॉस्पिटलसाठी येणाऱ्या खर्चाचा भार तुमच्या खिश्यावर पडणार नाही. सध्या नोकरी विमा देखील लोकप्रिय होत आहे. हा विमा असल्यास नोकरी गेल्यास हफ्ते भरण्यास मदत होते.    

नोकरी गेल्यास असे करा आर्थिक नियोजन    

हफ्त्यांचे करा नियोजन – नोकरी गेल्यास येणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे घराचे, गाडीचे हफ्ते कसे भरायचे. यासाठी तुम्ही आ धीच जमा केलेल्या इमर्जेंसी फंडमधून हफ्ते भरू शकता. जर तुमच्याकडे पैसे नसल्यास तुम्ही संबंधित बँकेशी बोलून काही महिन्यांसाठी हफ्ता भरण्याची मुदत वाढवून घेऊ शकता.    

अनावश्यक खर्च टाळा- नोकरी गमावल्यास अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही यासाठी खर्चाची यादी करू शकता.    

विमा – अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना विमा प्रदान करतात. तुम्ही त्या कंपनीतील नोकरी गमवल्यानंतर देखील विमा पोर्ट करून घेऊ शकता. तुम्ही कंपनीच्या एचआरशी बोलून या संदर्भातील नियम जाणून घेऊ शकता.  विमा पोर्ट केल्यास तुमच्या खिश्यावर  हॉस्पिटलच्या खर्चाचा भार पडणार नाही.    

नोकरी शोधत राहा- अडचणीच्या काळात तुम्ही एखादी पार्ट टाईम नोकरी शोधू शकता. यामुळे तुमचा आर्थिक खर्च भागवण्यास नक्कीच मदत होईल. तसेच, तुमच्या गुणवत्तेप्रमाणे नोकरी मिळेपर्यंत तुम्ही मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांचीही मदत घेऊ शकता.