प्रश्न: माझे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. मला काम करत असतानाच उच्च शिक्षण कसे पूर्ण करता येईल?
महामनीचे उत्तर – 12वी पास झाल्यानंतर त्वरित नोकरीचा निर्णय घेणे कौतुकास्पद आहे. कमी वयातच नवीन गोष्टी शिकण्यासोबतच कमाई मिळवणे चांगले आहे. मात्र, कामासोबतच शिक्षण घेणे आव्हानात्मक ठरू शकते. अनेकदा कामामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र, योग्य नियोजन केल्यास काम करताना उच्च शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे. नोकरी करतानाच उच्च शिक्षण पूर्ण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्याबाबत जाणून घेऊयात.
नोकरीसोबतच उच्च शिक्षण घेताना या गोष्टी ठेवा लक्षात
वेळेचे योग्य नियोजन | काम आणि शिक्षण एकाचवेळी करणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. दोन्ही गोष्टींना वेळ देणे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. बऱ्याच वेळा कामासाठी 8 ते 10 तास द्यावे लागतात व यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे नोकरीसोबतच उच्च शिक्षण घेताना वेळेचे योग्यप्रकारे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. |
मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (Open and Distance Education) | गेल्याकाही वर्षात मुक्त आणि दूरस्थ शिक्षण प्रकार लोकप्रिय झाला आहे. या प्रकारामुळे तुम्ही कधीही व कोठुनही स्वतःच्या वेळेनुसार शिक्षण पूर्ण करू शकता. अभ्यासासाठी स्वतःच्या वेळापत्रक तयार करू शकता. अनेक विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची शिक्षण पद्धत सुरू झाली असल्याने तुम्हाला सहज उच्च शिक्षण पूर्ण करता येईल. |
डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेस | पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेताना नोकरी करणे शक्य होत नाही. कारण अशा अभ्यासक्रमासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही डिप्लोमा अथवा सर्टिफिकेट कोर्सेसची निवड करू शकता. अशा कोर्सेसचा कालावधी पदवीच्या तुलनेत कमी असल्याने त्वरित शिक्षण पूर्ण होते. |
उच्च शिक्षण घेताना नोकरीचे पर्याय
1.फ्रीलान्सिंग (लेखन, संपादन) | 6. सोशल मीडिया मॅनेजर |
2. व्हीडिओ एडिटिंग | 7. डेटा एंट्री |
3. शिकवणी (Tutoring) | 8. वस्तू उत्पादन क्षेत्र |
4. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट | 9. फोटोग्राफी/व्हीडिओग्राफी |
5. लॅब असिस्टंट | 10. इंटर्नशिप (शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात) |
लक्षात ठेवा की, शिक्षणसोबतच नोकरी करत असाल तर असे काम निवडा, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकेल. तुमच्या शिक्षणाशी संबंधित काम केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. तुम्हाला भविष्यात अधिक करिअरच्या दृष्टीने अनेक चांगल्या संधी मिळतील.
तसेच, शिक्षण पूर्ण करताना पार्ट टाईम नोकरी करणे कधीही चांगले. यामुळे शिक्षणावरही योग्य प्रकारे लक्ष केंद्रीत करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण घेताना त्याच्याशी संबंधित क्षेत्रात/कंपनीत इंटर्नशिप करा. यामुळे नवीन कामाचा अनुभव मिळेल.