Best AC Double Decker e-Bus: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अॅण्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टने मुंबईकरांसाठी डबल डेकर एसी ई-बस आणली आहे. सध्या ही बस ठराविक मार्गांवर सुरू आहे. लवकरच ती शहरातील इतर मार्गांवर सुरू होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात, या डबल-डेकर ई-बसची खास वैशिष्ट्ये.
Best AC Double Decker e-Bus: बेस्टच्या विशेष उपक्रमांतर्गत एसी डबल-डेकर ई-बस लवकरच मुंबईत सुरू होणार आहे. बेस्टने विकत घेतलेल्या या स्पेशल बस
मुंबईत दाखल झाल्या असून त्यांची ट्रायल घेण्यात आली आहे. त्या लवकरच मुंबईतील रस्त्यावर धावताना दिसेल, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी दिली.
कोणत्या मार्गावर ई-बस धावणार आहेत?
एसी डबल-डेकर सध्या ठराविक मार्गावर धावणार असून यात कुर्ला - सांताक्रूझ या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. कुर्ला डेपोतून पहिली डबल-डेकर एसी ई-बस धावणार आहे. तसेच कुलाबा डेपो, मजार डेपो आणि कुर्ला डेपोतून या बसेस शहरातील मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या मार्गावर धावणार आहेत.
डबल-डेकर ई-बसमध्ये सुविधा काय आहेत?
- डबल-डेकर एसी ई-बसमधून 78 प्रवाशी प्रवास करू शकतात.
- ई-बसमध्ये आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन दरवाजे आहेत.
- यात डिजिटल टॅप-इन टॅप-आऊट तिकिट उपलब्ध असणार आहे.
- तसेच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
डबल-डेकर ई-बसचे भाडे काय आहे?
डबल-डेकर ई-बसचे किमान भाडे नियमित एसी बस प्रमाणेच 6 रुपये आहे. या बससाठी बेस्ट दररोज प्रत्येक गाडीसाठी प्रति किलोमीटर 56 रुपये भाडे देणार आहे. तर यातून बेस्टला प्रति किलोमीटर 75 रुपये मिळतील, असा अंदाज बेस्टला आहे.