Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Corporate FD: कॉर्पोरेट FD वर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर! बँक FD पेक्षा यात वेगळं काय?

Corporate FD

Image Source : www.etmoney.com

बँकांमधील पारंपरिक मुदत ठेवींमध्ये जशी गुंतवणूक करता येते, तशी कॉर्पोरेट एफडी हा सुद्धा एक पर्याय आहे. बँकांपेक्षा दीड टक्क्यांपर्यंत जास्त व्याजदर यातून मिळू शकतो. मात्र, बँक FD आणि कॉर्पोरेट FD मध्ये काय फरक आहे ते आधी जाणून घ्या.

Corporate FD: बँकांतील मुदत ठेवींचे व्याजदर मागील काही दिवसांपूर्वी उच्चांकावर होते. मात्र, आता पुन्हा मुदत ठेवींचे व्याजदर खाली येत आहेत. अनेक आघाडीच्या बँकांचे व्याजदर 7% च्या आसपास आले आहेत. स्मॉल फायनान्स बँकाचे व्याजदर तुलनेने बरे आहेत. मात्र, त्यामध्येही  जोखीम असते.

गुंतवणुकदारांसाठी मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याचा आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या FD. अनेक कंपन्या 8% पेक्षा जास्त व्याजदर कॉर्पोरेट एफडीवर देत आहेत. अल्प आणि दीर्घकालावधीच्या या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. 

कॉर्पोरेट एफडीमधील गुंतवणुकीत जोखीम काय? 

बँका आणि बिगर वित्तीय संस्थांमधील FD या सर्वाधिक सुरक्षित समजल्या जातात. या ठेवी सुरक्षित असतात. आरबीआयद्वारे वित्तसंस्थांचे नियमन केले जाते. (Difference between bank FD and Corporate FD) 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना सरकारद्वारे विमा संरक्षण मिळते. मात्र, कॉर्पोरेट मुदत ठेवींना असे कोणतेही संरक्षण मिळत नाही. मुद्दल आणि व्याज गमावण्याचीही वेळ येऊ शकते. मात्र, चांगले रेटिंग असलेल्या एफडी जास्त सुरक्षित समजल्या जातात.  

corporate-fd-table.jpg

ट्रिपल A रेटिंग कॉर्पोरेट FD जास्त सुरक्षित  

कॉर्पोरेट एफडी ही एक असुरक्षित प्रकारातील गुंतवणूक आहे. 

कंपनीचे रेटिंग पाहून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करावी. ट्रिपल A रेटिंग असलेल्या FD जास्त सुरक्षित समजल्या जातात.

कंपन्यांच्या एफडीचे आरबीआयद्वारे नियमन केले जात नाही. या FD कंपनी कायद्यानुसार नियंत्रित केल्या जातात. 

मुद्दल आणि व्याज जाण्याची भीती असते. (Risk in Corporate FD) मात्र, चांगले रेटिंग असलेल्या कंपनीतील गुंतवणूक जोखीम कमी करू शकता. 

ज्येष्ठ नागरिकांना आणि महिला गुंतवणुकदारांना कॉर्पोरेट एफडीमध्ये अतिरिक्त व्याजदर दिला जातो. बँक एफडीमध्येही हा फायदा पाहायला मिळतो. 

बँक एफडीपेक्षा 0.75 ते दीड टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर कॉर्पोरेट FD मधून मिळू शकतो. 

CRISIL, CARE आणि ICRA या संस्थांद्वारे कॉर्पोरेट FD ला दिलेले रेटिंग आधी तपासा. त्यानंतरच गुंतवणूक करा. 

फक्त जास्त व्याजदर पाहून कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करू नये. कंपनीची बॅलन्स शीटही तपासावे. NPA, नफा, या गोष्टींतून कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत स्पष्टता येईल.