Sarathi Fellowship Scheme: नागपूर जिल्ह्यातील थडीपवणी येथील रहिवाशी असणाऱ्या मंगलाताई. गेले 12 वर्ष स्वतः कमाई करून कुटुंबाचे पालनपोषण करत आहे. मुलांचे शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले. पण, आता मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे होते आणि घरची परिस्थिती जेमतेम होती. मग आता करायचं काय?
म्हणून मंगलाताईने नागपूर येथील उद्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष राम वाडीभस्मे यांच्याशी चर्चा केली आणि त्यातुन हा मार्ग निघाला. त्यांनी सारथी फेलोशिपबद्दल माहिती दिली, तेव्हा मंगला ताईंची चिंता मिटली. त्यांची मुलं सारथी फेलोशिपसाठी पात्र होती. जाणून घेऊया सारथी फेलोशिप बद्दल
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे या महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या स्वायत्त संस्थेकडून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, समाजाच्या नॉन क्रिमीलेअर उमेदवारासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम राबविले जातात. त्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्यात येतो. असाच एक अभिनव उपक्रम म्हणजे छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती CSMNRF 2023 होय.
या फेलोशिपच्या माध्यमातून M Phil व Ph. D करणाऱ्या विद्यार्थ्यांना 35000 रुपये शिष्यवृत्ती दरमहा दिली जाते. 2021-22 मध्ये या फेलोशिपचा लाभ महाराष्ट्रातील 10 हजार विद्यार्थ्यानी घेतल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या उपक्रमांतर्गत SARTHI च्या मार्गदर्शक तत्वानुसार पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.
Table of contents [Show]
फेलोशिपचे नाव आणि उद्दिष्टे
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेअर उमेदवारांसाठी असलेल्या या शिष्यवृत्तीचे नाव छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन फेलोशिप CSMNRF 2023 असे आहे.
या फेलोशिप मागील महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे भारतातील विद्यापीठ, संस्था, महाविद्यालयात मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी मराठा, जातीतील एम फिल व पीएच डी. पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे आहे.
फेलोशिप कधीपर्यंत लागु राहते?
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती CSMNRF 2023 अंतर्गत अंतिमरीत्या निवड झालेल्या उमेदवारांना उपरोक्त प्रमाणे आर्थिक सहाय्य हे SARTHI कडून ज्या रोजी अवार्ड लेटर दिले जाईल त्या तारखेपासून उमेदवारांच्या एम. फील. च्या उर्वरित कालावधी करिता किंवा दोन वर्ष यापेकी जी अगोदरची तारीख असेल त्या तारखेपर्यंत लागु राहील.
सारथी फेलोशिपचे वेळापत्रक
| फेलोशिप नाव | छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन फेलोशिप | 
| पात्र प्रवर्ग | मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी | 
| ONLINE अर्ज सुरुवात | 29 एप्रिल 2023 | 
| ONLINE अर्ज शेवट | 15 मे 2023 | 
| हार्ड कॉपी जमा | 25 मे 2023 पर्यंत पोहोचणे आवश्यक | 
| अधिकृत वेबसाईट | http://sarthi-maharashtragov.in- | 
अर्ज कसा करावा?
सारथी फेलोशिपसाठी अर्ज अधिकृत वेबसाइटला जाऊन करावा. त्यात मागितलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यावी. अर्जाचा नमूना पुढीलप्रमाणे..

 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            